*मा.क.पा आणि किसान सभेच्या मागणीला यश*
*ज्वारी - मका शासकीय खरेदी झालेल्या १८४ शेतकऱ्यांना पेमेंट मिळण्याचा मार्ग मोकळा*
महाराष्ट्रा राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या वतिने ज्वारी -मका खरेदी करण्यात आलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पैसै मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
शासकीय खरेदी केद्रं इस्लापुर येथे १५९४ शेतकऱ्यांनाचे धान्य खरेदी झाली,त्या पैकी १४१० शेतकऱ्यांना धान्य खरेदी चे पेमेंट मिळाले, उर्वरित शेतकऱ्यांना खरीदिचे पोर्टल बंद पडल्यामु पेमेंट मिळाले नाही. पोर्टल बंद पडने, शेतकऱ्यांना पेमेंट न मिळने या अडचणी ला घेऊन मा.क.पा व किसान सभेचे नेते काॅ.अर्जुन आडे यांनी सतत पाठपुरावा केला.
मा.तहसीलदार साहेब व सहकारी आदिवासी विकास मंडळ कार्यलय किनवट यांच्या कर्मचाऱ्यांना भेटून यातील तांञीक अडचणी सोडवून शेतकऱ्यांना पेमेंट देण्यासाठी प्रयत्न चालु आहे असे लेखी दिल्यानंतर होणारे उपोषन स्थगित करण्यात आले.
त्या नंतर मा.पालकमंञी अशोकराव चव्हाण यांना या विषयी किसान सभेने सांगितल्यानंतर मा.अशोकराव चव्हाण यांनी मा.जिल्हाअधिकारी नांदेड यांना या प्रकरणी निर्णय घेण्यास सांगितले, त्यानुसार आज मा.क.पा व किसान सभेच्या शिष्टमंडळाने मा.जिल्हाअधिकारी यांची भेट घेतली , झालेल्या बैठकीस राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ चे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, या बैठकीत धान्य दिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी बंद झालेले आॅनलाईन पोर्टल सुरु करुन पेमेंट देण्याचे निर्देश या वेळी मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिले. या प्रमाणे सहकारी आदिवासी महामंडळ किनवट यांनी संचालक सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांना प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच हे आॅनलाईन पोर्टल सुरु करुन उर्वरित शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात येईल.
या समग्र प्रकरणात मा.पालकमंञी अशोकराव चव्हाण,मा.क.पा चे आमदार काॅ.विनोद निकोले,किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष काॅ.डाॅ.अशोक ढवळे, मा. जिल्हाधिकारी मा.विपीन इनटकर ,मा.तहसीलदार किनवट यांनी हस्तक्षेप करून उर्वरित शेतकऱ्यांना पेमंट मिळवून देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
आज मा.जिल्हा अधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेते मा.क.पा चे कामगार नेते काॅ.गंगाधर गायकवाड, काॅ.शिवाजी फुलारे उपस्थित होते.
तर काल किनवट येथे झालेल्या बैठकीत काॅ.अर्जुन आडे, शेतकरी नेते खंडेराव कानडे, काॅ.जनार्दन काळे, काॅ.स्टॅलिन आडे ,
काॅ.आनंदराव चव्हाण, काॅ.अजय चव्हाण, काॅ.मोहन जाधव उपस्थित होते.