Ticker

6/recent/ticker-posts

हेही वाचा...1800 रुपयांसाठी वाद घालणाऱ्या 'त्या' काकूंच्या व्हिडिओची राज्य सरकारनं घेतली दखल पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड जलवाहिणीचे काम बंद करावे, या मागणीसाठी सोमवारी खेड तालुक्यात या धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलवाहिनीवर बसून जेलभरो आंदोलन केलं. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. आंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावेळी एका शेतकऱ्यानं थेट अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी गाडीत नेताना गाडीतून पडून एक शेतकरी गंभीर जखमी झाला

हेही वाचा...1800 रुपयांसाठी वाद घालणाऱ्या 'त्या' काकूंच्या व्हिडिओची राज्य सरकारनं घेतली दखल
 पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड जलवाहिणीचे काम बंद करावे, या मागणीसाठी सोमवारी खेड तालुक्यात या धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जलवाहिनीवर बसून जेलभरो आंदोलन केलं. यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. आंदोलक शेतकऱ्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावेळी एका शेतकऱ्यानं थेट अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी गाडीत नेताना गाडीतून पडून एक शेतकरी गंभीर जखमी झाला.
: मागील 30 वर्षांपासून सुरू असलेली भामा-आसखेड धरणग्रस्तांची परवड अद्यापही थांबलेली नाही आहे. जमिनीच्या बदल्यात जमीन द्या, असा कोर्टाचा निर्णय असताना सरकार आणि अधिकारी मात्र आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे: पालकमंत्र्यांसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं अखेर सोमवारी भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. जलवाहिणीची सुरू असलेले काम बंद करावे आणि मग शेतकऱ्यांसमवेत मिटिंग करावी, असा सूर लावला. भामा-आसखेड प्रकल्पग्रस्तांनी पुणे जलवाहिनीचे काम आजही काही वेळ बंद पाडलं. "आम्हाला अटक करा, नाहीतर काम बंद करा" अशी ठाम भूमिका प्रकल्पग्रस्तांनी यावेळी मांडली होती. परंतु आम्हाला काम बंद करण्याचा अधिकार नसल्यानं आम्ही काम बंद करू शकत नाही, अशी भूमिका चाकण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश धस यांनी घेतली. त्यामुळे आंदोलक ठाण मांडून बसले आहेत. शेवटी चिडलेल्या आंदोलकांनी प्रशासन सरकार विरोधात भूमिका घेत घोषणाबाजी सुरू केल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केली.
: हेही वाचा...शिवसेना खासदार संजय जाधवांनी अखेर सोडलं मौन, राष्ट्रवादीविरुद्ध कसली कंबर
 : पुणे येथे जिल्हाधिकारी यांच्या समवेत काही प्रमुख शेतकऱ्यांची बैठक झाली. परंतु या झालेल्या बैठकीत काही समाधानकारक तोडगा निघाला नाही. काम बंद करण्याची सूचना मिळाली नाही, त्यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी काम बंद करण्याची मागणी करीत सोमवारी पुन्हा जलवाहिनी काम सुरू असणाऱ्या ठिकाणी ठिय्या मांडला. यावेळी सत्यवान नवले, देवीदास शिवेंकर, रोहिदास गडदे, ज्योती कुदळे, गजानन कुडेकर, आण्णा देवाडे, स्वप्निल येवले, संतोष कावडे, गजानन कुडेकर, किसन नवले, गणेश जाधव, तुकाराम नवले, संदीप होले, शांताराम शिवेंकर, नवनाथ शिवेंकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. एका शेतकऱ्यानं थेट अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी गाडीत नेताना गाडीतून पडून एक शेतकरी गंभीर जखमी झाला.
 पुणे, 31 ऑगस्ट: 'अरे इथून मागे तू गुरं वळत होतास ना. आम्ही पण गुरच वळतोय...बोलण्याची काही अक्कल आहे का तुला. अर्थमंत्री आहेस ना?...पाठीमागं मावळत सहा-सात मारलीस तू. इथं पण तुला मावळ करण्याचा आहे काय', असा घणाघात करत भामा-आसखेड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी थेट राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट केलं. त्यांच एकेरी उल्लेख करत समाचार घेतला.