Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये आज 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी, 9 बाधितांची भर किनवट / तालुका प्रतिनिधी : किनवटमध्ये शुक्रवारी ( ता. 04) रात्री 08. 10 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 05 व रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 04 अशा एकूण 9 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे


किनवटमध्ये आज 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी, 9 बाधितांची भर 

किनवट / तालुका प्रतिनिधी : किनवटमध्ये शुक्रवारी ( ता. 04) रात्री 08. 10 वाजता प्राप्त माहिती नुसार आरटीपीसीआर टेस्ट द्वारे 05 व रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 04 अशा एकूण 9  रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 224  झाली आहे. आज 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी दिली, आजपर्यंत 120 व्यक्तींना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 67 रुग्ण उपचार घेत आहेत.32 जण होम क्वारंटाईन आहेत. 8 रुग्ण संदर्भिय सेवेसाठी इतरत्र दाखल  आहेत. 
       आज आलेल्या तपासणी अहवालात किनवटच्या राजेंद्रनगर येथील 45 वर्षाचा 1 पुरुष, वेलमापूरा येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, गोकुंद्यातील प्राध्यापककॉलनी येथील 41 वर्षाची महिला, दत्तनगर येथील 52 वर्षाचा 1 पुरुष, 38 वर्षाचा 1 पुरुष, 11 वर्षाच्या 2 मुली,13 वर्षाची 1 मुलगी व निचपूर येथील   येथील 25 वर्षाचा 1 पुरुष अशा 09जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
       आज नवे रुग्ण आढळल्याने सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण एच. पुजार, भाप्रसे, यांनी निचपूर गावाला कंटेन्मेंट झोन जाहिर केले आहे. या सर्व कंटेनमेंट झोनच्या विविध कामांची जबाबदारी तहसिलदार उत्तम कागणे यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, उप विभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, पोलिस निरिक्षक मारोती थोरात, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांचेवर सोपविलेली आहे. हे अधिकारी नेटाने ती पार पाडत आहेत.
             
         डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 29, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 38 व होम क्वारंटाईन 32 अशा एकूण 97 व  पूर्वीचे 8 संदर्भित रुग्ण सेवेसाठी इतरत्र दाखल केले आहेत. अशा एकूण 105 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता. 04/09/2020 रात्री O8.10 वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
घेतलेले एकूण स्वॅब- 496,
निगेटिव्ह स्वॅब- 365,
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह  संख्या-05,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 50 ,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 

ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट - 20,
 निगेटिव्ह अहवाल - 16,
आज रोजी पॉझिटीव्ह अहवाल - 04,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण -09,
आज मृत्यू - 0,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या- 10, 
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -215, 
आज सुटी दिलेले-02,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 120,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 67 ( 32 होम क्वारंटाईन + 08 संदर्भित इतरत्र उपचार घेताहेत )