Ticker

6/recent/ticker-posts

दुर्लक्षित कोविड सेंटर .........किनवट तहसील / गोकुंदा मी दिनांक 29 /8 /2020रोजी तपासणी केली असता माझी टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आहे. पहिल्यांदा मला किनवट तहसील कोविड सेंटर येथे ठेवण्यात आले मी त्यांना विचारले की मला किनवट सेंटरला का ठेवता गोकुंद्याला का नाही मला उत्तर मिळाले की ज्याला जास्त त्रास त्याला गोकुंदा व इतरांना किनवट ला


दुर्लक्षित कोविड सेंटर .........
किनवट तहसील / गोकुंदा 
मी दिनांक 29 /8 /2020रोजी तपासणी केली असता माझी टेस्ट पॉझिटिव्ह निघाली आहे. पहिल्यांदा मला किनवट तहसील कोविड सेंटर येथे ठेवण्यात आले मी त्यांना विचारले की मला किनवट सेंटरला का ठेवता गोकुंद्याला का नाही मला उत्तर मिळाले की 
ज्याला जास्त त्रास त्याला गोकुंदा  व इतरांना किनवट ला
किनवट कोविड सेंटर.......
१)आंघोळीची सोय नाही 
२)बकीट नाही ही इतर साहित्य नाही
३)ऑक्सिजन मोजण्यासाठी ऑक्सी मीटर नाही का नाही असे विचारले असता खराब झाले आहे असे उत्तर मिळाले
४)रुग्णांना इतर काही आजार असल्यास त्याची ट्रीटमेंट करण्याची ची सोय नाही
५)रूम मध्ये  खूप मच्छर आहेत
६)सफाई कामगार फक्त बाहेरूनच सफाई करतात रूम मध्ये येऊन सफाई करत नाहीत

किनवट कोविड सेंटर तसेच गोकुंदा कोविड सेंटर येथे रुग्णांना इतर आजार असल्यास त्याची तपासणी करण्याची सोय असावी जसे की छातीचा एक्स-रे, सीबीसी, व इतर रक्त तपासण्या......

गोकुंदा कोविड सेंटर येथे डॉक्टर गोणेवार व व डॉक्टर गुंटापेल्लीवार यांचे सहकार्य लाभले....
परंतु दोन्ही कोविड सेंटरमध्ये स्वच्छतेचा खूपच अभाव दिसून आला
दोन्ही कोविड सेंटर मध्ये डॉक्टर तसेच नर्स सुद्धा पेशंट कडे जास्त वेळ देत नाहीत.....

*किनवट तालुक्यातील नेते, समाजसेवक,पत्रकार सर्वांना विनंती की आपण सर्वांनी पी पी इ किट घालून किनवट मधील दोन्हीही पॉझिटिव्ह कोविड केअर सेंटरला अचानक पणे भेट देऊन माझ्या या पत्राची शहानिशा करावी सत्य आपल्याला लगेच कळेल......*

असे लिहिण्याचे कारण की
१)दहा दिवस आंघोळ केली नाही तर काय होईल...........
२)रूम मध्ये स्वच्छता नसेल तर.............
३)रूम मध्ये खूप मच्छर असतील तर.......

४)पॉझिटिव्ह रुग्णांची रक्त तपासणी केली नाही तर त्यांना इतर आजार बळवण्याची दाट शक्यता असते ५)छातीचा एक्स-रे काढला नाही तर फुफुसावरील इंफेक्शन कळणार नाही
६)रुग्णांना दररोज अंडे खायला द्यायला पाहिजे 
७)रुग्णांचे दररोज ऑक्सिजन तपासायला पाहिजे यासाठी ऑक्सी मिटर किनवट कोविड सेंटरला असावे ज्याची किंमत 450 ते 1000 रु आहे.........
*मला कोणाचीही तक्रार करायची नाही परंतु वस्तुस्थिती सर्वांसमोर मांडायचे आहे*
 भारतीय नागरिक ॲडजस्ट करून घेण्यात खूप माहीर आहे, अशा ऍडजेस्ट करणाऱ्या सर्व नागरिकांना माझा प्रणाम
                🙏 नमस्कार 🙏
       रवी गोपाळराव नेम्मानिवार   
             (पॉझिटिव्ह रुग्ण)
जिल्हा परिषद शिक्षक ता. किनवट
              9822343722