किनवटमध्ये आज 5 बाधितांची भर
किनवट / तालुका प्रतिनिधी : किनवटमध्ये शुक्रवारी ( ता.25) सायंकाळी 06.00 वाजता प्राप्त माहितीनुसार रॅपिड ऍटिजेन टेस्ट द्वारे 5 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 480 झाली आहे. आजपर्यंत 305 व्यक्तींना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सुटी दिली आहे. बाधितांपैकी येथील कोविड केअर सेंटरमध्ये 42 रुग्ण उपचार घेत आहेत 87 जण होम क्वारंटाईन आहेत.
आजच्या अहवालात एस.व्ही.एम. कॉलनी,किनवट येथील 28 वर्षाचा 1 पुरुष, आयप्पा मंदीर परिसर येथील 72 वर्षाचा 1 पुरुष व बोधडी (बु) 65 वर्षाचा 1 पुरुष, 42 वर्षाची 1 स्त्री, 14 वर्षाचा 1 मुलगा अशा 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज रोजी दयाळ धानोरा येथील 60 वर्षाच्या महिलेच्या मृत्यू झाला आहे .
डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 13, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 29 व होम क्वारंटाईन 87 अशा एकूण 129 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता. 25/09/2020 सायंकाळी 06.00 वाजता
आरटीपीसीआर टेस्ट
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 629,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब- 530,
आज घेतलेले स्वॅब - 0
आज आरटीपीसीआर स्वॅब पॉझिटिव्ह संख्या- 0,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या - 0,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
ऍन्टिजेन टेस्ट
ऍन्टिजन टेस्ट -44,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-5,
निगेटिव्ह अहवाल -39,
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-5,
आज मृत्यू - 0,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती - 480,
आज सुटी दिलेले- 0,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-305,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-42 (129 होम क्वारंटाईन )