Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेब ठाकरेंनी जी सेना निर्माण केली ती आता ‘सोनिया सेना’ झाली! ; कंगनानं पुन्हा डिवचलं


मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा विकून शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली आहे, अशी बोचरी टीका अभिनेत्री कंगना राणावतने केली आहे. संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका अशा शब्दात कंगना राणौतनं शिवसेनेवर आरोप केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत संबोधत आव्हान देऊन अवघे काही तास उलटले नाहीत, तोच कंगनाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

“श्री बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारसरणीवर शिवसेना निर्माण केली, आज तीच विचारधारा सत्तेसाठी विकली आणि शिवसेनेची ‘सोनिया सेना’ झाली. ज्या गुंडांनी माझे घर माझ्या मागे फोडले, त्यांना नागरी संस्था म्हणू नका, संविधानाचा इतका मोठा अपमान करु नका” असे ट्वीट कंगनाने केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेससोबत केलेल्या हातमिळवणीवरुन कंगनाने निशाणा साधला.


 

दरम्यान, कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादात बुधवारी बऱ्याच नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रात्री कंगनाने ट्वीट करून पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. रात्री केलेल्या ट्विटमध्ये कंगना म्हणाली की, मी आता आपल्या मुंबईत आहे. आपल्या घरात आहे. माझ्यावर वारसुद्धा करण्यात आला, पण तो मी विमानात असताना मागून करण्यात आला. मला समोरून नोटिस देण्याची किंवा समोरून वार करण्याची हिंमत माझ्या शत्रूमध्ये नाही. माझ्या कार्यालयाच्या करण्यात आलेल्या नुकसानामुळे अनेक लोक दु:खी आणि चिंतित आहेत. मी त्यांचे आशीर्वाद आणि प्रेमासाठी ऋणी आहे असं कंगनानं म्हटलं होतं.
⭐हैलो दोस्तों, यूट्यूब चैनल *aaj ki news kinwat में 
 हमारे विडीयो को 👍 लाईक कीजिए, 👉 शेयर कीजिए  *कमेंट्स* 🖊में आपकी प्रतिक्रिया देकर हमारे चैनल *आज की न्युज किनवत* को *सब्सक्राइब* कीजिए। ओर दोस्तों 🔔 *बेल आइकॉन* को प्रेस करना ना भूलें ताकी हमारे नए वीडियोज़🎬 कि अपडेट आपको मिलती रहे
⭐नितीन मधुकर कालेकर⭐ आज् की न्युज जिल्हा प्रतिनिधी पुणे
जाहिरातीसाठी ⭐सम्पर्क-8551888031⭐