किनवट :(तालूका प्रतिनिधी)
येथील कॉस्मापॉलिटन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक वाय. एम. राठोड यांना संस्थेने नुकतीच पर्यवेक्षक पदी पदोन्नतीने देली असून या प्रसंगी शाळा प्रशासना तर्फे त्यांंचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देवुन सत्कार करण्यात आला. कॉस्मापॉलिटन विद्यालय किनवट हे गेल्या 56 वर्षापासुन शहरात कार्यरत असुन अनेक विध्यार्थी घडविण्याचे काम या शाळेतील शिक्षकांनी केले आहे. यात महत्वाची भूमिका बजावणारे व 31 वर्ष सेवा पूर्ण करणारे वाय. एम राठोड यांच्या सेवेची दखल घेऊन शाळा प्रशासनाने त्यांना पदोन्नती दिलेली आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विध्यार्थी घडविण्याचे काम केले. तसेच किनवट तालुक्यात लेझीम पथकास खरी ओळख दिली. क्रिड स्पर्धेत राज्य पातळीपर्यंत विद्यार्थ्यांनी मजल मारली आहे.
सर्त प्रसंगी संस्थेचे सचिव पी व्ही रामतीर्थकर, अध्यक्ष नामदेवराव रामतिर्थकर, मुख्याध्यापक कारामुंगे, ज्येष्ठ शिक्षक आर. वी घोरबांड , राठोड, महाशेट्टे , मोहिते , बामणीकर, बारापात्रे, गरुडे, जाधव, बोलेनवार, बाळकृष्ण कदम ,कयापाक, वाघमारे, बेलखोडे आदी शिक्षक तर गोरे, बंड्रेवार मामाम पंतगे, तोडासाम शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.