मुंबई: मातोश्रीवर धमकीचे फोन करणाऱ्या आरोपींना एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सनीवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन गेला होता. त्यावर दया नायक तपास करत कोलकाताहून आरोपींना अटक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. यासंबंधी आज ४ वाजता पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली जाणार आहे.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना यांना एका अज्ञात नंबरहून धमकीचे फोन आले असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली होती. इतंकच नाही तर खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आले. देशमुख यांनी कंगना रणौतवर टिप्पणी केल्यावर हे फोन आले असल्याचं मह्टलं होतं. या फोन प्रकरणाची चौकशी सुरक्ष यंत्रणा करत होती.
ज्यांना धमकीचे फोन आले आहेत. त्यांची क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी आरोपींचा शोध लावत त्यांना कोलकाताहून ताब्यात घेण्यात आलं आहे. तर आरोपींची पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबईवरून अज्ञान व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारणार आणि मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची फोन करणाऱ्याने धमकी दिली. दुबईहून अज्ञात व्यक्तीने ३ ते ४ फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर केल्याही माहिती पुढे आली होती.फोन कॉल मातोश्री बंगल्यावरील पोलिस ऑपरेटर ने घेतले होते. त्यानंतर मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था वाढिण्यात आली होती.
हैलो दोस्तों, यूट्यूब चैनल *aaj ki news kinwat में
हमारे विडीयो को 👍 लाईक कीजिए, 👉 शेयर कीजिए *कमेंट्स* 🖊में आपकी प्रतिक्रिया देकर हमारे चैनल *आज की न्युज किनवत* को *सब्सक्राइब* कीजिए। ओर दोस्तों 🔔 *बेल आइकॉन* को प्रेस करना ना भूलें ताकी हमारे नए वीडियोज़🎬 कि अपडेट आपको मिलती रहे
नितीन मधुकर कालेकर आज् की न्युज जिल्हा प्रतिनिधी पुणे
जाहिरातीसाठी सम्पर्क-8551888031