Ticker

6/recent/ticker-posts

पुढ्यात आलेल्या स्थितीवर मात करून कौशल्य वापरून शिक्षकांनी नंदादीपाप्रमाणे ज्ञानदीप सतत तेवत ठेवावा-गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने


पुढ्यात आलेल्या स्थितीवर मात करून कौशल्य वापरून शिक्षकांनी नंदादीपाप्रमाणे ज्ञानदीप सतत तेवत ठेवावा
-गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने

किनवट / तालुका प्रतिनिधी : शैक्षणिक प्रवाहात काम करतांना पुढ्यात आलेल्या कोणत्याही परिस्थितीवर आपल्यातील कौशल्य वापरून मात करून शिक्षकांनी नंदादिपा प्रमाणे ज्ञानदीप सतत तेवत ठेवावा. असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले.
                जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेड, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नांदेड आणि गटसाधन केंद्र, पंचायत  समिती, किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. 12 ) आयोजित केलेल्या मारेगाव (वरचे ) आणि दहेली तांडा परिक्षेत्राच्या "बीटस्तरीय ऑनलाइन शिक्षण संवाद कार्यशाळेत" मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
                या कार्यशाळेला डायटचे प्राचार्य डॉ. रविंद्र अंबेकर, किनवटचे संपर्क अधिकारी अधिव्याख्याता अभय परिहार, शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र जाधव, शिवाजी खुडे, केद्र प्रमुख, प्रकाश होळकर, विजय मडावी, गंगाधर शेरलावार व  वैजनाथ काळे उपस्थित होते.
                पुढे बोलतांना गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने म्हणाले की,मारेगाव व दहेली तांडा या दोन्ही बिटात गुणवत्ता पूर्ण काम करणारे एकापेक्षा एक सरस शिक्षक आहेत. भिंत तिथे फळा हा उपक्रम रोहिदास तांडा या ठिकाणी राबविल्या जात आहे. दहेली तांडा या बिटाचा 60 किमी परिघात असून, हे बिट उपक्रमशील बिट म्हणून ओळखले जाते. येथील 36 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले. लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम राबवून उद्योन्मुख विद्यार्थी लेखक व्हावेत यासाठी बाबुराव मुसळे या लेखकाचे अनुभव कथन विद्यार्थ्यांना करून दिले. येथील विद्यार्थी गणितामध्ये कोटीं पर्यंतच्या संख्या ओळखतात. किनवट तालुका दुर्गम व आदिवासी भाग असल्यामुळे गृहभेटीतून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे शिक्षण घडवून आणले जात आहे.
               यानंतर मारेगाव बिटातून शालिनी सेलूकर, सुरेश पाटील,  रुपेश मुनेश्वर आणि दहेली तांडा बिटातून आशीर्वाद कोतपिल्लेवार,  अरुण बसवंते, बालाजी पिटलेवाड या उपक्रमशील शिक्षकांनी सादरीकरण केले.             
               सुलभक शिक्षक राहुल तामगाडगे,
रहीमउद्दीन शेख यांनी शैक्षणिक दिनदर्शिका, अभ्यासमाला व दीक्षा ॲपचा संयुक्तिक वापर, रमेश मुनेश्वर, नामदेव चाकुरे यांनी टीलिमीलीचे महत्व व त्याचा उपयोग, गुंजकर व सतीश शिरगुरवार यांनी व्हर्च्युअल क्लासरूम कसे घ्यावे याचे प्रात्यक्षिक , सी. एम सरपे, प्रकाश कांबळे यांनी शिष्यवृत्तीची पूर्वतयारी व अंमलबजावणी अंमलबजावणी, कुरुंदक, हिरामण राठोड यांनी महाकरिअर पोर्टल, गजेंद्र बोड्डेवार यांनी बालरक्षक  भगवान एकंबे यांनी शिक्षकमित्र या संकल्पनांचे सुलभिकिकरण केले.
               शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी खुडे यांनी प्रास्ताविक केले.केंद्रप्रमुख वैजनाथ काळे व विषयतज्ज्ञ बाबूराव ईब्बितदार यांनी  आभार मानले.
              शरद कुरुंदकर, आर. वाय. तामगाडगे, संजय कुसुमकर , टी. बी. बावनकर यांनी या ऑनलाइन कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी तांत्रिक साहाय्य केले.
या कार्यशाळेस मारेगाव बिटातील कमठाला, मोहपुर, मारेगाव (व) आणि दहेली तांडा बिटातील दहेली, उमरी (बा.), खंबाळा या केंद्रातील सहभागी सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त करून, दिशादर्शक कार्यशाळा संपन्न झाली, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.