Ticker

6/recent/ticker-posts

उपचारासाठी संदर्भ सेवेची संधी " माझे कुटूंब माझी जबाबदारी " या मोहिमेच्या माध्यमातून दारापर्यंत आली ; त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा- आमदार भीमराव केराम

उपचारासाठी संदर्भ सेवेची संधी  " माझे कुटूंब माझी जबाबदारी " या मोहिमेच्या माध्यमातून  दारापर्यंत आली ; त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा
- आमदार भीमराव केराम

किनवट / तालुका प्रतिनिधी : कोविड -19 सह  इतर सर्व आजारांच्या उपचार घेण्याच्या संदर्भ सेवेची संधी  " माझे कुटूंब माझी जबाबदारी - कोविडमुक्त महाराष्ट्र "
या मोहिमेच्या माध्यमातून आपल्या दारापर्यंत आली आहे. तेव्हा सर्व नागरिकांनी कुटूंबातील सर्व सदस्यांची आरोग्य पथकाकडून तपासणी करून घ्यावी. न लपवता सर्व आजाराची माहिती द्यावी. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
                नगर पालिके समोर शिवाजी चौक  येथील भंडारे परिवाराच्या वाड्यात  कोरोनाचा प्रादुर्भाव थोपविण्यासाठी "माझे कुटूंब माझी जबाबदारी - कोविडमुक्त महाराष्ट्र " या मोहिमेच्या घर सर्वेक्षणाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते .
                यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, भाप्रसे, तहसिलदार उत्तम कागणे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष अजय चाडावार, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक साजीदखान, माजी उपाध्यक्ष तथा नगरसेवक श्रीनिवास नेम्माणीवार, अभय महाजन,  भाजप तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे, डॉ. किरणकुमार नेम्माणीवार, डॉ. संतोष गुंडापेल्लीवार, स्वच्छता निरीक्षक चंद्रकांत दुधारे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
            नगरसेवकांनी व सरपंचांनी दिलेल्या स्वयं सेवकांच्या सहकार्याने चौघांचे एक आरोग्य पथक नियुक्त केले असून गाव व वार्डनिहाय हे पथक प्रत्येक घरी जाऊन कोविडच्या अनुषंगाने संदेश देईल व कुटूंबातील सर्वांची ऑक्सिमीटर व थर्मलगन द्वारे तपासणी करणार आहेत.