पिंपरी चिंचवड :चार वर्षापासून दरोड्याच्या गुन्हयात पाहिजे असलेला रावण टोळीचा म्होरक्या व त्याच्या साथीदाराला अग्निश्त्र व दोन जिवंत काडतूसासह चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
विकी ऊर्फ अनिरूद्व राजू जाधव ( वय २४, रा. जाधव वस्ती, रावेत, पुणे ) व मन्या ऊर्फ नंदकिशोर शेषराव हाडे (वय २२, रा. जाधव वस्ती, रावेत, पुणे) यांना अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील गुरूद्वारा चौकाकडून तहसील कार्यालयाकडे रेल्वे पटरीच्या खालून जाणा-या रोडच्या बाजुस दोन व्यक्ती संशयीत रित्या फिरत आहे.त्यातील एका इसमाच्या कमरेला हत्यार दिसत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चारही बाजुने तपासपथकातील कर्मचा-यांना पाठवुन सापळा रचला व मोठ्या शिताफीने दोघांना पकडले.त्यांची झडती घेतली असता त्यांच्या जवळून एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा ३५,५००/ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी विकी ऊर्फ अनिरूद्ध राजू जाधव हा सध्या रावण टोळीचा म्होरक्या व सराईत गुन्हेगार असून नुकताच मोक्याच्या गुन्हयातुन जामीनावर सूटला आहे.तर ,आरोपी मन्या ऊर्फ नंदकिशोर शेषराव हाडे हा देखिल रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगीरी ही कृष्णप्रकाश साो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, रामनाथ पोकळे सो अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, स्मिता पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पिंपरी चिंचवड, रामचंद्र जाधव साो सहा पोलीस आयुक्त साो पिंपरी विभाग, रविंद्र जाधव साो वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिंचवड पोलीस ठाणे, विश्वजीत खुळे साो पोलीस निरीक्षक ( गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोहवा पांडुरंग जगताप, पोहवा भाऊसाहेब मोईकर, पोना स्वप्निल शेलार, पोना रुषीकेश पाटील, पोना विजयकुमार आखाडे, पोशि पंकज भदाणे, पोशि नितीन विठठल राठोड, पोशि गोविंद डोके, पोशि अमोल माने, पोशि सदानंद रुद्राक्षे यांनी केली आहे.