Ticker

6/recent/ticker-posts

*नंदीग्राम एक्सप्रेस , नागपुर- मुंबईच ठेवण्याची मागणी*



*नंदीग्राम एक्सप्रेस , नागपुर- मुंबईच ठेवण्याची मागणी*

( राजेश पाटील)तालुका प्रतिनिधी किनवट :
मुंबई -नागपुर -मुंबई धावणारी नंदिग्रा  एक्सप्रेस हि रेल्वेगाडी नांदेड मुंबई अशी धावणार असेल तर किनवट येथुन एकही रेल्वे गाडी धावु देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी पक्षाचे ता . अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी दिला  आहे, नंदीग्राम एक्सप्रेस सह, तिरुपतीला जाणारी कृष्णा एक्सप्रेस , बौध्दगया जाणारी दिक्षाभुमी एक्सप्रेस गाडी व अदिलाबाद ते परळी, अदिलाबाद ते पुर्ण गाडी देखील तात्काळ सोडण्यात याव्या अशी हि मागणी त्यानी या द्वारे केली आहे हि गाडी नांदेड येथुन सोडण्यात येणार असल्याचे पत्र समाज माध्यमावर प्रसारीत होत आहे.
ती गाडी नागपुर ते नांदेड दरम्यान रद्द करण्यात आली आणि ती नादेंड ते मुबंई दरम्यान सोडण्यात येणार असल्याचे दक्षिण मध्य रेल्वेच्या हैद्राबाद येथील कार्यालय द्वारे प्रसीध्द करण्यात आले आहे .
यामुळे परीसरातील अनेक नागरीकांनी तिव्र संताप व्यक्त केला आहे कारण मराठवाडा व विदर्भातील सिमावर्ती भागातील नागरीकांना राज्याच्या विविध ठिकाणी ये -जा करण्याकरिता उपयुक्त असलेली गाडी व गंभीर आजाराच्या रुग्णा करीता हि एकमेव गाडी आहे व विविध कामाकरीता व जिल्हयाच्या ठिकाणी जाण्यासाठी हिच गाडी आहे या रेल्वे प्रश्ना करीता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या पर्यंत एक शिष्टमंडळ जाणार असल्याचे राठोड यांनी सांगितले किनवट येथील नागरीकांसाठी नंदीग्राम हि एक जिवन वाहीनी आहे किनवट, माहुर, भोकर, हिमायतनगर, नांदेड नागरीका करीता नंदिग्राम हि खुप महत्वाची आहे जी दक्षीण मध्य रेल्वेला जादा प्रमाणात महसुल मिळवुन देणारी आहे लॉक डाऊन नंतर जन जीवन पुर्वपदावर येत आहे त्यामुळे नागरीकांची गैरसोय होऊ नये या साठी नंदिग्राम रेल्वे प्रश्नी प्रकाश राठोड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.