Ticker

6/recent/ticker-posts

अपघात होऊन आमचा जीव गेला की प्रशासन जागे होईल का?मावळातील शेवती ग्रामस्थांचा प्रशासनाला प्रश्न


मावळ(नितीन कालेकर) पुणे: मावळात पावसाचे प्रमाण हे प्रचंड प्रमाणात असते.भात हे प्रमुख उत्पादन असल्याने तेथील शेतकरी या दिवसात पिक घेत असतो.बरेचशे विजेचे खांब हे शेतकऱ्यांच्या बांधावरुन अथवा रानातुन गेलेले आहेत.ब-यापैकी शेतकऱ्यांना या गोष्टीचा शासनामार्फत मोबदला ही मिळालेला नाही.विद्युत विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागायची वेळ आली आहे.मावळातील शेवती या गावामध्ये प्रवेश करतांना रस्त्याच्या बाजूला असलेली उच्च दाबाच्या उघड़या विद्युत डीपींमुळे स्थानिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.लहान मुले चुकुनही खेळताना हात लागण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. सध्या पड़त असलेल्या पावसामुळे डीपीत वीज प्रवाह उतरून मोठी दुर्घटना घडण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. गेले कित्येक दिवस झाकना अभावी डीपी उघड़ी आहे.

गावात प्रवेश करतांना डीपी शेजारुन जावे लागते.अशा बऱ्याच ठिकाणी उच्च दाबाच्या डीपी उघड़या आहे.महाराष्ट्र क्राईम वॉच संगे बोलताना,शेवती ग्रामस्थांची प्रशासनाला प्रश्न केला की, अपघात होऊन आमचा जीव गेला की प्रशासन जागे होईल का? त्यामुळे हा धोका लक्षात घेऊन महावितरण प्रशासनाने या डीपीला झाकने बसवणे गरजेचे आहे.