Ticker

6/recent/ticker-posts

ई-पिक पाहणी संदर्भात मोबाईल ॲप विकसित करताना यामध्ये कोणत्याही उणीवा राहू नये


ई-पिक पाहणी संदर्भात मोबाईल ॲप विकसित करताना यामध्ये कोणत्याही उणीवा राहू नये यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे तसेच या मोबाईल ॲपचा उपयोग शेतकऱ्यांना समजावून सांगणे महत्वाचे आहे असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ई-पिक पाहणी बाबत आयोजित बैठकीत सांगितले.

या ॲपमुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होण्याबरोबरच त्यांच्या मालाला योग्य भाव व चांगली बाजारपेठ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ईज ऑफ डुईंग बिझनेस’ ठरणे आवश्यक असल्याने येणाऱ्या काळात राज्यातील पिकांचा नकाशा तयार करण्याचे उद्दिष्ट आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.