Ticker

6/recent/ticker-posts

धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालयवर ‘ढोल बजावो’ आंदोलन


भिगवण ( नारायण मोरे ) : इंदापूर तालुका धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने आज (दि.२५) रोजी इंदापूर तहसील कार्यालयासमोर समाज्याच्या विविध मागण्यासाठी’ढोल बजावो’ आंदोलन करण्यात आले. यासाठी कृती समितीच्या वतीने तहसिलदार सोनाली मेटकरी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात असे म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस सरकारने आदिवासी समाजाप्रमाणे धनगर समाजासाठी २२ सवलती लागू केल्या होत्या. तसेच शेळी मेंढीपालन महामंडळास १००० कोटी जाहिर केले होते. त्याची अंमलबजावणी त्वरीत करावी व आरक्षणासाठी जी देवेंद्र फडणवीस सरकारने ठोस पावले उचलली होती. तशी या सरकारने उचलावीत या व इतर मागण्या मान्य करणेसाठी झोपलेल्या सरकारला जाग यावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचे माऊली चौरे यांनी सांगितले.


 
यावेळी माऊली चौरे, रामभाऊ पाटील, महेंद्र रेडके, रंजित पाटील, माऊली वाघमोडे, भाऊसाहेब अर्जुन, गणपत करे, बापू पारेकर, तानाजी मारकड, श्रावण चोरमले, बाळासाहेब डोंबाळे, पोपट कचरे, धनाजी देवाकाते, आबासो थोरात, नवनाथ दडस, संतोष देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.