Ticker

6/recent/ticker-posts

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण स्थगिती उठवावी व पोलीस भरती थांबवावी या प्रमुख मागणीसाठी किनवट येथे


किनवट:(तालूका प्रतिनिधी).  
            सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण स्थगिती उठवावी व पोलीस भरती थांबवावी या प्रमुख मागणीसाठी  किनवट येथे दिनांक 23 रोजी आमदार  भीमराव केराम यांच्या घरासमोर  धरणे आंदोलन देत आमची बाजू शासनास कळवावी यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. 
        यावेळी  सकल मराठा समाजाच्या वतीने विविध घोषणा देण्यात आल्या व शासनाचा निषेध करण्यात आला. शासनाने जर सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली असती तर हे आरक्षण टिकले असते. तामिळनाडू, केंद्र शासनाने दिलेले आरक्षणाला स्थगिती न  दे पाच न्याय मुर्तीच्या खंडपिठाकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. परंतु मराठा आरक्षण स्थगिती का देण्यात आली. लवकरात लवकर या आरक्षणाच्या स्थगिती उठवावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडावी. आणि तोपर्यंत आर्थिक दुर्बल घटकांचा लाभ देण्यासाठी योग्य पावले उचलावी. ताबडतोब पोलीस भरती थांबवावी किंवा तेरा टक्के जागा सोडून पोलीस भरती करावी यासह अनेक मागण्या निवेदनात नमूद आहे.  या वेळी सकल मराठा समन्वय समितीस समाजाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याचे त्यांच्या उपस्थितीतून दिसून आले. 
     
चौकट 
==================================
 आमदार भीमराव केराम यांनी स्वतः निवेदन स्वीकारून आरक्षणाच्या समर्थनातच आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत हे निवेदन मी तात्काळ शासनाच्या कळविणार असल्याचे त्यांनी सांगत धरण. आंदोलनात उपस्थिती दर्शविली. 
==================================