Ticker

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड शहरात दिवसभरात १२५९ नवीन रुग्ण, १० रुग्णांचा मृत्यू


पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज दिवसभरात शहरातील १२४० आणि शहराबाहेरील १९ असे १२५९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत त्यामुळे शहरातील कोरोनाबधिताची संख्या ५८ हजार ७४७ वर पोहचली आहे. तर आज १० रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. दरम्यान, आज ५०२ रुग्णांना जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.

आज शहरात दिवसभरात शहरातील १२४० आणि शहराबाहेरील १९ अश्या १२५९ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरणाबधिताची संख्या ५८,७४७ झाली आहे.त्यात दिलासादायक बाब म्हणजे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. आज शहरातील ५०२  रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ४८,०९४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.


 
दरम्यान आज चिखली (पुरुष ५४ वर्षे), काळेवाडी (पुरुष ७३ वर्षे), भोसरी (पुरुष ५७ वर्षे, स्त्री ७० वर्षे), चिंचवड (स्त्री ७८ वर्षे), थेरगांव (पुरुष ६८ वर्षे), वाल्हेकरवाडी (स्त्री ४९ वर्षे), खेड (पुरुष ६८ वर्षे), भवानीपेठ पुणे (पुरुष ३९ वर्षे), खेड (पुरुष ६९ वर्षे) येथील रहिवासी असणार्या १० रुग्णांचा आज कोरोनामुळे वायसीएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे.त्यामुळे आतापर्यंत शहरातील ९६६ जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या २३९ अशा १२०५ जणांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत ५८,७४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ४८,०९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील ९६६ जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या २३९ अशा १२०५ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ६०८१ सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

📺 Youtube 

⭐हैलो दोस्तों, यूट्यूब चैनल  Aaj ki news kinwat . हमारे विडीयो को 👍 लाईक कीजिए, 👉 शेयर कीजिए  *कमेंट्स* 🖊में आपकी प्रतिक्रिया देकर हमारे चैनल *⭐आज की न्युज किनवत* को *सब्सक्राइब* कीजिए। ओर दोस्तों 🔔 *बेल आइकॉन* को प्रेस करना ना भूलें ताकी हमारे नए वीडियोज़🎬 कि अपडेट आपको मिलती रहे

नितीन मधुकर कालेकर⭐ 
आज् की न्युज जिल्हा प्रतिनिधी पुणे
जाहिरातीसाठी सम्पर्क-8551888031