Ticker

6/recent/ticker-posts

किनवट : मागील अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयाला अखेर आमदार भीमराव केराम यांच्या


किनवट : मागील अनेक वर्षांपासून खितपत पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयाला अखेर आमदार भीमराव केराम यांच्या पाठपुराव्यामुळे मूर्तरूप येणार असल्याचे संकेत (ता.९) रोजी पणन सहसंचालक विनायक कोकरे यांनी निर्गमित केलेल्या पत्रकामुळे मिळाले असून पणन मंत्री जयंत पाटील यांनी या संदर्भात बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.
               माहूर,किनवट सह राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कार्यरत कर्मचारी यांना शासन सेवेत कायम समावून घेण्याच्या मागणीला अखेर किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या पाठ पुरव्यामुळे मूर्तरूप येणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.


◼️पणन मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील किनवटचे आमदार भीमराव केराम व मराठा क्रांती ठोक मोर्चा प्रमुख आबासाहेब पाटील यांच्या पत्रावर झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने सहकार व पणन मंत्री जयंत पाटील यांनी अनुकूल असल्याचे दर्शवित तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

◼️आमदार भीमराव केराम यांच्या पाठपुराव्याला यश

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी आमदार भीमराव केराम यांनी पणन मंत्री जयंत पाटील यांना ता.२१ जुलै व १९ ऑगस्ट असे सलग दोन पत्र पाठवले होते. या पत्राची दखल घेऊन पण या मंत्र्यांनी या संदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिल्यानंतर किनवट तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंद संचारला असून आ.केराम यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश येऊन त्यांना शासन सेवेत समावले जाईल अशी आशा पल्लवित झाली असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.