Ticker

6/recent/ticker-posts

किनवट / तालुका प्रतिनिधी : किनवट व गोकुंदा येथील विविध कार्यालयात ध्वजवंदन करून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला


किनवट / तालुका प्रतिनिधी : किनवट व गोकुंदा येथील विविध कार्यालयात ध्वजवंदन करून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
           येथील उप विभागीय अधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजिलेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार (भाप्रसे ) यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. पोलिस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उप निरीक्षक गणेश पवार यांच्या नेतृत्वात सशस्त्र पोलिस पथकाने मानवंदना व सलामी दिली. 
           संगीत विशारद गायिका आम्रपाली वाठोरे-कांबळे यांनी राष्ट्रगीत व देशभक्ती गीत गाईले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यकमास आमदार भीमराव केराम, तहसिलदार उत्तम कागणे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, साजीदखान, आदिवासी सेवक नारायणराव सिडाम, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ सदस्य डॉ. अशोक बेलखोडे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी डी.एम. तपासकर, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, वैद्यकीय अधिकक डॉ. उत्तम धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अभय महाजन, सुरेश जाधव, सुरेखाताई काळे, परवीन बेगम आदीं मान्यवरांसह सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध कार्यालयाचे प्रमुख मास्क बांधून व शारीरिक अंतर ठेऊन उपस्थित होते.  
                 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, के. डी. कांबळे, अशोक कांबळे, रामेश्वर मुंडे, शिवकांता होनवडजकर, राम बुसमवार यांनी पुढाकार घेतला.
           

पंचायत समिती, किनवट येथे ध्वजवंदन

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त किनवरच्या पंचायत समितीत व गट शिक्षणाधिकारी कार्यालयात उप सभापती कपील करेवाड यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उप सभापती गजानन कोल्हे पाटील, पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने, पंचायत समितीच्या विविध विभागाचे प्रमुख, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख उपस्थित होते.

 बळीराम पाटील महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व स्वारातिम विद्यापीठ स्थापना दिन साजरा
 
येथील  बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड चा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. एस के बेंबरेकर यांनी प्रांरभी राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पुजन करून राष्ट्रीयध्वज व विद्यापीठध्वज ध्वजवंदन केले. 
                याप्रसंगी एन.सी.सी . च्या विद्यार्थानी सलामी दिली. यावेळी उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्माणीवार, डॉ. जी.बी.लांब, पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, रा. से . यो कार्यक्रमाधिकारी डॉ. पंजाब शेरे, प्रा. सुलोचना जाधव, गणित विभाग प्रमुख प्रा. उमाकांत इंगोले, रसायन शास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद भालेराव, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अंबादास कांबळे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शुभांगी दिवे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा.ममता जोनपेल्लवार, हिंदी विभाग  प्रमुख प्रा. शेषेराव माने,  प्रा.सी.जी. दमकोंडवार,   , प्रा. आम्रपाली हटकर , प्रा. शिल्पा सर्पे, प्रा.डी. व्ही. चाटे, ग्रंथपाल मंदाकिनी राठोड,यमुना कुमरे, दीपक खंदारे, मिलींद लोकडे, के. एन पिपरे, बी.डी.चव्हाण, आशा शिरपूरकर,  तसेच राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेचेस्वयं सेवक, स्वंयसेविका, प्राध्यापक वृंद ' शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्य ने उपस्थित होते . राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता  झाली.