किनवट/प्रतिनिधी—राम किशन काग्ने aaj ki news kinwat) नांदेड जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी बांधकाम सभापती दिनकर दहिफळे यांच्या मातोश्री तथा बोधडी बु. जिल्हा परिषद मतदार संघाच्या सदस्या श्रीमती सुनंदाबाई ओमप्रकाश दहिफळे यांचे आज (०२ सप्टेबर २०२०) दुपारी नांदेड येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं, दोन मुली, सुना, नातवंड असा मोठा परिवार आहे.
नांदेड जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी बांधकाम सभापती दिनकर दहिफळे यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदाबाई ओमप्रकाश दहिफळे यांचे आज दुपारी नांदेड येथिल खाजगी हास्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. आषाडी व कार्तीकीच्या पंढरपूरच्या वारीसाठी कट्टर वारकरी होत्या. अगदी भोळा स्वभाव, सोज्वळ वक्तव्य, दानशूर असा विविधांगी उत्तमोत्तम त्यांचा स्वभाव होता.
आजच त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी कळवले आहे. त्यांच्या पश्चात दिनकर आणि ज्ञानेश्वर हे दोन मुलं, सुना, दोन मुली व नातवंड असा मोठा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!🌺🙏🌺