Ticker

6/recent/ticker-posts

*अखेर अभय चव्हाण चे मृत्यूस कारणीभूत असलेल्या शारदा कन्स्ट्रक्शन चे मालकाविरूद्ध गुन्हा दाखल


*अखेर अभय चव्हाण चे मृत्यूस कारणीभूत असलेल्या शारदा कन्स्ट्रक्शन चे मालकाविरूद्ध गुन्हा दाखल*....................
माहूर तालुक्यातील  बंजारा तांडा शिवारात रहदारीचे रस्त्यालगत चार पाच शेतकरयाचे शेतात माहूर किनवट रोडचे कामाकरिता लागणारे मुरूम, दगड  शासकीय नियमाचा भंग करून तीन मीटर खोल खोदण्याची परवानगी असताना नऊ मिटर खोलीचे उत्खनन शारदा कन्स्ट्रक्शन कंपणी नांदेडचे वतीने उत्खनन करण्यात आले. शिवाय त्या ठिकाणी काम चालू असताना पावसाळयाचे पाण्याने त्या खड्डयात पाणी साचून पाण्यात बुडून वन्यजीव, प्राणी व मणूष्य यांचे जीवीत्वास धोका निर्माण होऊन जीव जावू शकतो अशी पूर्व कल्पना असताना देखील कंपणी मालकाने त्या ठिकाणी संरक्षणात्मक उपाययोजना कठडे, कुंपण किंवा चौकीदार ठेवले नाही व पाण्याचा विसर्ग होण्यासाठी विल्हेवाट लावली नाही व आम नागरिकांना त्या परिसरात प्रवेशापासून प्रतिबंधीत करणारे फलक देखील लावले नाही. व त्या ठिकाणी खोदलेल्या खड्डयातील दहा बारा फुट पाण्यात  रेवानाईक पार्डी येथील 14वर्षाचा शाळकरी मुलगा अभय गणेश चव्हाण हा दिनांक 29/08/2020 रोजी पाय घसरून पाण्यात पडून बुडून मरण पावला होता. त्याचे मृत्यूस कारणीभूत असलेल्या शारदा कन्स्ट्रक्शन चे मालकाविरूद्ध गुन्हा नोंदण्यास सिंदखेड पोलीस स्टेशनची टाळाटाळ करित असल्याने मयत अभय चे वडील गणेश गेमसिंग चव्हाण यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, माणव अधिकार आयोग यांना ऑनलाईन फिर्याद पाठवली होती तसेच निरनिराळ्या संघटनांना सहकार्याचे आवाहन करताच प्रहार संघटनेचे उपजिल्हा प्रमुख राजेशभाऊ आंबटवार, लोकमत पत्रकार, पुढारी वार्ता यांनी फिर्यादी ला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला व त्यांच्या पुढाकाराने अखेर दिनांक 23ऑगस्ट रोजी सिंदखेड पोलीसांनी शारदा कन्स्ट्रक्शन कंपणी तर्फे मारोती गोविंराव पानपट्टे हल्ली मुक्काम राजगड यांचे विरोधात  हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्यामुळे  304 (अ)प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.