खेड : घरात एकटी असणाऱ्या एक अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील सोनगाव गावात घडली आहे. ही घटना मंगळवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून खेड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रोशन खेराडे असे अटक केलेल्या तरुणाचे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन हा पीडित अल्पवयीन मुलीच्या वाडीत राहतो. तो विवाहित असून त्याची पत्नी गर्भवती आहे. मंगळवारी पीडित मुलगी ही घरात एकटी होती घरातील लोकं कामावर गेल्यानंतर व तिची आई दवाखान्यात बाहेर गेल्यानंतर ती शेजारील काकूंकडे गेली होती. त्यावेळी रोशन खेराडे हा त्या मुलीच्या घरात शिरून लपून बसला होता. ती अल्पवयीन मुलगी घरात आल्यानंतर घरातील दरवाजा आतमधून बंद करून त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. जर कुणाला सांगितलेस तर मारून टाकेन अशी धमकी देखील दिली. संध्याकाळी त्या मुलीचे पालक घरी आल्यानंतर तिने घडलेली सर्व हकीकत आई वडिलांना सांगितली.
त्यानंतर पीडित मुलीचे पालक आणि तिच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्या नंतर खेड पोलिसांनी रोशन खेराडे याला ताब्यात घेतले. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार खेराडे याच्यावर भादवी कलम ३७६, तसंच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा ( पोस्को ) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली