Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्याच्या मालाचा चुकारा नगदी करा; खासदार हेमंत पाटील यांची संसदेत मागणी


शेतकऱ्याच्या मालाचा चुकारा नगदी  करा; खासदार हेमंत पाटील यांची संसदेत मागणी 
---------------------------
किनवट/माहूर: शेतकऱ्यांच्या शेतमालाचा काटा करताच त्याच्या मालाला योग्य तो भाव देऊन नगदी चुकारा करा तरच देशातील शेतकरी जिवंत राहील अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी संसदेत केली. किनवट तालुक्यातील प्रलंबित असलेले मका आणि ज्वारी खरेदीचे चुकारे तात्काळ द्यावेत हा मुदा उपस्थित करताना खासदार हेमंत पाटील यावेळी बोलत होते. या सोबतच  शेतकरी व्यापार व वाणिज्य( पदोन्नती आणि सुलभता )  विधेयक , शेतकरी ( सबलीकरण आणि संरक्षण )किंमत विमा आणि करार विधेयकास समर्थन दिले.आणि शेतमाला  संदर्भाने उपस्थित केलेला लवाद हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत न चालविता तहसीलदारांकडे चालविण्याची तरतूद करण्यात यावी अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली . 

          बाजारात आज टीव्ही किंवा कोणतीही वस्तू खरेदी केल्यावर तीन दिवसांनी पैसे दिले तर चालणार का असा खणखणीत सवाल खासदार हेमंत पाटील यांनी   लोकसभेत कृषी संवर्धन व सरळीकरण विधेयकाचे समर्थन करताना मांडला . भारत हा कृषी प्रधान देश असून देशातील बहुतांश शेतकरी दोन एकर पेक्षा कमी जमीनक्षेत्र धारण करतात या विधयेकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपला माल कोणालाही विकण्याचा अधिकार प्राप्त  होणार आहे त्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी कृषिमंत्री नरेंद्र तोमर कैलास चौधरी रुपारेल यांचे आभार मानले ,पुढे बोलताना ते म्हणाले कि, यापूर्वी बाजार समित्यांनी ठरवून दिल्यानुसार दलाल आणि अडत्यांमार्फत आपला शेतमाल विकावा लागत असे या कायद्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले , महाराष्ट्रात साखर सम्राटांनी झोनबंदी केल्याने शेतकरी आपला माल दुसरीकडे विकू शकत नव्हते. परंतु या विधेयकामुळे आपला माल आंतराराष्ट्रीय स्तरावर विकण्याची मुभा मिळणार आहे . बाजारात आजघडीला कांदा २५ रुपये दराने विकला जात असताना शेतकऱ्यांना मात्र फक्त १ रुपया मिळतो हि वस्तुस्थिती खासदार हेमंत पाटील यांनी संसदेच्या निर्दशनास आणून दिली. शेतकऱ्यांना दलालाच्या जोखडातून मुक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे " इकडे काटा करा आणि तिकडे नोटा द्या असे म्हणून शेतकरयांची बाजू  उचलून धरली 
        मतदार संघातील शेतकऱ्यांचे सर्वांगीण हित लक्षात घेऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती पाहून तातडीने या मागणीचा पाठपुरावा खासदार हेमंत पाटील यांनी केला जगाचा पोशिंदा अडचणीत तर देश अडचणीत हि भावना खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त  केली .