आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्याचे कृषिमंत्री मा.ना.दादाजी भुसे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे व शेतीचे नुकसानभरपाई व विविध कामांचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीस माझ्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले,जिल्ह्याप्रमुख तथा आमदार संतोषराव बांगर,हिंगोली विधानसभेचे आमदार तान्हाजीराव मुटकूळे, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलिस अधीक्षक एस.राकेश कलासागर,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस शर्मा, यांच्यासह शिवसेना जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती फकिरा मुंढे,उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख,नगरसेवक राम कदम, जिल्ह्यातील अधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.