*मा.क.पा किसान सभे च्या वतिने इस्लापुर येथे जोरदार आंदोलन*
बॅक, रस्ते ,नेटवर्क प्रश्नावर किसान सभा आक्रमक
*बँकांची मनमानी बंद करा, शेतकऱ्यांना तातडणी कर्ज द्या- काॅ.अर्जुन आडे*
मा.क.पा आणि किसान सभेच्या वतिने ५ संप्टेबंर रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली होती.आंदोलनाचा भाग म्हणून आज किनवट तालुक्यात किसान सभेच्या वतिने जोरदार आंदोलन करण्यात आले.
२ दोन लाख पेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या वरील रक्कम भरणा करून घेऊन शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यावे.
शेतकऱ्यांचे संपूण कर्ज माफ करा,
दीडपट हमी भाव देऊन विना विलंबी कर्ज शेतकऱ्यांना वाटप करा.
शिवणी परिसरातील अनेक खेड्यात वाडी तांड्यात इंटरनेट व नेटवर्क ची सुविधा व शिवणीपासून अनेक गावांत जाण्यासाठी खराब रास्ते नवीन व दुरुस्त करून देणे बाबत, किमान वेतन एक्काविस हजार रुपये द्या ,नियमित पीक कर्ज परत फेड करणाऱयांना प्रोत्सानपर पन्नास हजार रुपये मदत देने असे अनेक मागणी सह अनेक मागण्या मागत इस्लापुर येथील भारतीय स्टेट बँके समोर व बसस्टँड च्या मुख्य चौकात आंदोलन करण्यात आले, वरील सर्व समस्या चे निवेदन नांदेड जिल्ह्या सचिव कॉ.अर्जुन आडे यांच्या हस्ते तहसील कार्यालयाचे महसूल विगाचे मंडळाधिकारी जाधव व तलाठी
भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक व सहायक निबंधक सुपे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
करोना काळातील अभूतपूर्व संकट जनतेवार आलेले असतांना देशातील भांडवलादारानां कर्ज माफ करणे, जनविरोधी धोरंने मोदी सरकारने सात्याताने घेत आहे. या विरोधात इस्लापुर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले,सोबत किनवट तालुक्यातील रस्ते, नेटवर्क च्या समस्या, बँके कडून कर्ज वाटप करणे इत्यादी मागण्या यावेळी घेण्यात आल्या .
सरकारने तातडीने २ लाखा च्या वर कर्ज असलेला शेतकऱ्यांना बद्दल निर्णय घ्यावे तसेच पुनरगठण केलेल्या शेतकऱ्यांना संदर्भात निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली .
या वेळी बॅक मेनेजर यांच्या सोबत शिष्टमंडळाने चर्चा केली, सर्व शेतकऱ्यांनाचे कर्ज प्रकरण निकाली काढण्याचे लेखी आश्वासन या वेळी मॅनेजर यांनी दिले.
सोबत रस्ते, नेटवर्क, संबंधित मागण्याचे निवेदन मंडळ अधिकार जाधव यांना देण्यात आले.
आंदोलनात शेकडो शेतकरी -युवकांनी सहभाग घेतला.
आंदोलनांचे नेतृत्व काॅ.अर्जुन आडे ,काॅ.इरफान पठाण, काॅ.स्टँलिन आडे ,शेतकरी नेते काॅ.खंडेराव कानडे, प्रकाश वानखेडे, काॅ.प्रशांत जाधव, काॅ.अंबर चव्हाण, बंटी पाटील, पंडीत चव्हाण, काॅ.धनराज आडे,सुनिल राठोड, साई राठोड, जितु राठोड,अजय राठोड,शिनु चव्हाण, तानाजी राठोड आदिनी केले.
या वेळी पोलीस निरीक्षण किनगे साहेब,आलेवार साहेब यांनी चोक बंदोबस्त ठेवला.