मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन
मुस्लिम आरक्षणासाठी शासनाचा विरोध नाही. पालकमंत्री श्री सुभाष देसाई.
शिक्षणात मुस्लिम आरक्षणास शिवसेनेचा पाठिंबा असून सरकार मधील इतर पक्षाचीही सहमती आहे व योग्य वेळी संबंधीचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन औरंगाबाद
चे पालकमंत्री श्री सुभाष देसाई यांनी श्री मोहसीन अहमद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळास दिले.
नामदार श्री देसाई यांनी वरील शिष्टमंडळास या संबंधी चर्चेसाठी आज सायंकाळी ५.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात वेळ दिला होता. त्या प्रमाणे समितीच्या शिष्टमंडळाबरोबर त्यांनी चर्चा केली.ह्या चर्चा मधे नामदार संदीपणराव भुमरे आणि अब्दुल सत्तार उपस्थित होते. चर्चा सकारात्मक झाल्याबद्दल श्री मोहसीन अहमद यांनी पालकमंत्री व महाराष्ट्र शासनाचे आभार मानले आहे. या शिष्टमंडळात मोहसीन अहमद यांचे बरोबर अॅड. कैसरोदीन, डॉ. शाहेद शेख, एम. ए. गफार, अब्दुल कयूम, नोमान अहमद आदी उपस्थित होते.