किनवट ता.प्र दि १२ समाजा प्रती आपण काहीतरी देण लागतो या भावनेने समाजातील गरजवंता करिता सदैव झटणा-या श्री साईबाबा मंदिर सेवाभावी संस्थान किनवट या पवार गुरु स्वामी यांच्या मार्फत चालु असलेल्या सेवा कार्यात आणखी एका सेवेची भर झाली आहे. समाजात कोरोना नावाच्या विषाणुने माणसाचे बिनधास्त जगणे सजग केले आहे आता समाजातील प्रत्येक स्तराच्या व्यक्तीला औषधौपचार व स्वच्छतेचे महत्व कळु लागले आहे त्याच अणूषंगाने श्री साईबाबा मंदिर सेवाभावी संस्थान किनवट च्या वतीने आजारी व गरजवंत रुग्णांना मोफत औषधौपचार व रुग्णालय सेवा पुरवण्यात येत आहे.
या विषयी माहिती देतांना संस्थेचे पवार गुरु स्वामी यांनी सांगितले कि, किनवट शहर व तालुक्यातील नागरीक ज्यांची परिस्थिती नाही ते आमच्या संस्थेशी संपर्क साधु शकतात त्यांना मोफत औषधौपचार व रुग्णालय सेवा संस्थान तर्फे पुरवण्यात येईल यावेळी त्यांनी आणखी माहिती देतांना सांगितले कि, आम्ही आता पर्यंत संस्थान तर्फे दररोज गरवंत वृध्द व आजारी नागरीकांना घरपोच जेवन पुरवत आलो आहोत त्याच बरोबर प्रत्येक महिण्याच्या दर गुरुवारी नेत्र तपासणी शिबिर आयोजन करण्यात येते तसेच नित्य अन्न छत्र आयोजित करण्यात येतो, दरवर्षी गरजवंताना सातत्याने वस्त्र वाटप करण्यात येतात तर हिवाळ्याच्या दिवसात ब्लॅकेंट वाटप करण्यात येतात या सोबतच समाजात जेव्हा जेव्हा कोणत्याही स्वरुपाच्या कार्याची गरज भासली तेव्हा तेव्हा आम्ही संस्थेच्या मार्फत तिथे काम केले आहे. जसे कोरोना विषाणुमुळे अचानक लॉकडाउन घोषित करण्यात आले त्यावेळी आम्ही नागरीकांच्या जागृतीकरिता स्वतः उद्घोषक घेऊन आम्ही नागरीकांमध्ये जागृती केली तर अडकलेल्या नागरीकांना अन्न पुरवण्याचा काम केले यासोबतच प्रशासनालाही जेव्हा जेव्हा गरज वाटली तेव्हा तेव्हा त्यांनी आमच्या संस्थेने सहकार्य केले आहे.
तर आता सुरु होत असलेल्या या आरोग्य सेवेचाही लाभ परिसरातील नागरीकांनी घ्यावा असे संस्थान च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
संस्थानला हे सर्व कार्य पुर्ण करण्याकरता व यशस्वी करण्या करता परिसरातील दानशुर नागरीकांनी सदैव सहकार्य केले आहे या सोबतच ह्या आरोग्य सेवे करिता देखिल अनेक दानशुर प्रतिष्ठानांनी सहकार्याची भावना दाखवल्याने हे हि कार्य भगवंताच्या कृपेने यशस्वी होईल असा विश्वास श्री पवार गुरु स्वामी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला आहे.