Ticker

6/recent/ticker-posts

यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिले सन्मानपत्रकोरोना संकटात मदत करणारे इरफान मलनस सन्मानित



यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिले सन्मानपत्र

कोरोना संकटात मदत करणारे इरफान मलनस सन्मानित

प्रतिनिधी यवतमाळ

कोरोना पासून बचाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात नागरीकांना तसेच पोलिस विभागाला मदत करणा-या इरफान मलनस यांना यवतमाळ जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. त्यांनी राबविलेल्या मदत कार्याचे आता समाजातून सुध्दा कौतुक केले जात आहे. 

कोरोना काळात सरकार तर्फे लॉकडाऊन लावण्यात आले होते. यादरम्यान सर्वच दुकाने बंद असल्यामुळे तसेच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने गरीब नागरीकांवर उपासमारीची पाळी आली होती. या दरम्यान नियमांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने व्हावी म्हणून पोलिस विभागाचे कर्मचारी सुध्दा रस्त्यावर सतत आपली डयुटी बजावत होते. या काळात कोरानाचा संसर्ग होण्याची भीती असतांनाही त्याची पर्वा न करता महाराष्ट्र राज्य मानव अधिकार फेडरेशन चे राज्याचे अध्यक्ष इरफान मलनस तसेच त्यांचे कार्यकर्ते गरीब नागरीकांना तसेच पोलिस विभागातील डयुटीवर असलेल्या कर्मचा-यांना जेवन देण्याचे काम करीत होते. हे कार्य त्यांनी सतत जवळपास तीन महिणे सुरु ठेवले. या व्यतिरीक्त गरीब नागरीकांना कोरोना पासून संरक्षण होण्यासाठी सॅनिटायझर तसेच मास्क चे वाटप करण्यात आले. या कार्याची दखल घेत यवतमाळ जिल्हयाचे पोलिस अधिक्षक एम राजकुमार यांनी सन्मानपत्र देऊन इरफान मलनस यांचा गौरव केला. याकार्याबद्दल  उपविभागीय पोलिस अधीकारी माधुरी बावीस्कर तसेच यवतमाळ शहर पोलिस स्टेशनचे ठानेदार संजय सायरे यांनी सुध्दा त्यांचे कौतुक केले आहे. 

मदत करणे हे कर्तव्य

संकट काळात गरीब नागरीकांची मदत करणे हे प्रत्तेकाचे कर्तव्य आहे. यवतमाळात आमच्या संघटनेच्या वतीने नागरीक तसेच पोलिस कर्मचा-यांना मदत करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला. यापुढेही गरज पडल्यास आम्ही नागरीकांच्या मदतीसाठी धाऊन जाऊ याची मी ग्वाही देतो. 

इरफान मलनस
राज्य अध्यक्ष, मानव अधिकार फेडरेशन

सोबत फोटो- इरफान मलनस यांना सन्मान पत्र देतांना पोलिस अधिक्षक
एम. राजकुमार

प्रति, संपादक, जिल्हा प्रतिनिधी वरील वृत्त आपल्या प्रसिध्द वर्तमानपत्रात प्रकाशित करावे ही विनंती
इरफान मलनस
अध्यक्ष, मानव अधिकार फेडरेशन