Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि किनवट नगर परिषदेकडुन होऊ घातलेल्या सर्वसाधारण सभेत जर सत्ताधारी पक्षाने बेकायदेशीररित्या स्थानिक



किनवट ता.प्र दि  किनवट नगर परिषदेकडुन होऊ घातलेल्या सर्वसाधारण सभेत जर सत्ताधारी पक्षाने बेकायदेशीररित्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे जर शहरातील सराफा बाजार मधिल मोक्याचे कोट्यावधींचे भुखंड व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथिल पोलिस चौकी करिता ठराव मांडला तर त्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष एका सक्षम विरोधी पक्षाची भुमिका बजावुन तो भुखंड व अनावश्यक पोलिस चौकी मंजुर करण्याचा विषय हानुन पाडेल यावेळी कोणत्याही दबावाला बळी न पडता स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दबावाला न जुमानता आम्ही संपुर्ण ताकतीने तो विषय रेटुन धरु व त्यास विरोध करु अशी भुमिका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गटनेते झहिरोद्दीन खान यांनी मांडली आहे.
      यापुर्वीच सराफा लाईन मधिल ते भुखंड ज्या संस्थेकडे होते त्यासंस्थेकडे नगर परिषदेचे लाखो रुपये भाडे थकित आहे त्याच्या वसुली संदर्भात काहिच कारवाई नगर परिषदेकडुन करण्यात आली नाही.
      नगर परिषदेची मालमत्ता खाजगी व्यक्तींच्या ताब्यात असुन त्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात नगर परिषद सपशेल अपयशी झालेली असतांना नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या सर्वसाधारण सभेत काही मोक्याच्या मालमत्ता ह्या बेकायदेशीरपणे भाडेतत्वावर देण्याच्या हालचाली होत असुन तसा विषय सर्वाधारण सभेत मांडला गेल्यास त्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा कडाडुन विरोध असेल असे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे नगर परिषदेतील गटनेते झहिरोद्दीन खान यांनी जाहीर केले आहे.
      शहरातील सराफा बाजारात असलेल्या मोकळ्या भुखंडाचे आरक्षण बदलुन त्यास व्यापारी केंद्र म्हणुन त्याचा विकास करुन शहरातील सराफा व्यापा-यांसह इतर कामगार व कारागीरांना त्याठीकाणी आपली प्रतिष्ठाने चालवण्याकरिता दुकाने बांधुन ती उपलब्ध करुन द्यावी अशी भुमिका राष्ट्रावादी कॉग्रेस पक्षाची आहे परंतु त्यास स्थानिक लोकप्रतिनिधींच्या राजकिय हस्तक्षेपामुळे वेगळे वळण देण्यात येत आहे त्यास राष्ट्रवादी कॉग्रस पक्ष कडाडुन विरोध करेल असे ही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
      किनवट नगर परिषद हे अवैध प्रकारे मालमत्ता भाडेतत्वावर देण्याचे केंद्र बनले असुन त्यास विरोधी पक्ष या नात्याने शहरातील कोणतीही मालमत्ता बेकायदेशीरपणे भाडेतत्वावर देऊ देणार नाही व तसे होत असेल तर त्यास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष हे सरकार दरबारी जाब विचारेल असे ही त्यांनी यावेळी बोलतांना पत्रकारांना सांगितले आहे.
      मागील मार्च महिण्या पासुन किनवट नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झालेली नाही कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याने शासनाने सभा ऑनलाईन घेण्यास सांगितले आहे कारण कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव होऊ शकतो परंतु ऑनलाईन अशा पध्दतीने मागील सहा महिण्यापासुन किनवट नगर परिषदेची सभा झालेली नाही याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही तरी सहा महिण्यांनंतर होऊ घातलेली हि नगर परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी होणार असल्याचे निदर्शनास येत आहे कारण पदाधिका-यांनी सहा महिण्यापासुन विविध विषय हे ठरवुन ठेवले आहे.
      परंतु राजकारण करत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे ज्या ठीकाणी आवश्यकता नाही त्या ठीकाणी पोलिस चौकी मंजुर करण्या करिता सदनात प्रस्ताव मांडला जाऊ शकतो त्यामुळे असा मानस जर सत्ताधारी ठेवत असतील तर तो आम्ही उधळुन लावु असा घणाघात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गटनेते झहीरोद्दीन खान यांनी केला आहे तर यावेळी काझी सफायोद्दीन उर्फ गब्बर काझी हे देखील उपस्थित होते