Ticker

6/recent/ticker-posts

किनवट : स्वातंत्र्याची ७४ वर्षे लोटली तरी हि किनवट तालुक्यातील आदिवासी बहुल वसंतवाडी गट ग्रामपंचायत धामणधरी ते वडोली

किनवट : स्वातंत्र्याची ७४ वर्षे लोटली तरी हि किनवट तालुक्यातील आदिवासी बहुल वसंतवाडी गट ग्रामपंचायत धामणधरी ते वडोली ला ये जा करण्यासाठी मुळीच रस्ता नसल्याने रस्त्याच्या मागणीसाठी विध्यार्थी नेते विकास कुडमते यांच्या नेतृत्वाखाली वसंतवाडी (धामणधरी) येथील समस्त गावकऱ्यांनी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आज दि. ९ सप्टेंबर रोजी दिला आहे. 
     सविस्तर वृत्त असे कि या गावची लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे. येथील सर्व नागरिक मजुरी, शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तालुक्याचे अंतर ३० किमी आहे.  स्वातंत्र्याची ७४ वर्षे उलटली तरी अद्याप हि या गावाला मुळीच रस्ता नाही. वसंतवाडी, वडोलीसह परिसरातील अनेक गावातील लोकांना किनवट ला ये जा करण्यासाठी याच  धामणधरी-वडोली मार्गे जावे लागते. परंतु वडोली पर्यंत ६ किमी चा कच्चा रस्ता हि नसल्याने गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना चिखलातून रस्ता तयार करून ये जा करावी लागते. मागील ७४ वर्षांपासून येथील शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी या आदिवासी बहुल गावाला रस्ता 
करून दिला नाही. यामुळे आदिवासी बांधवाना पायी चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे. रस्त्या अभावी दुचाकी, चारचाकी वाहन येथे येत नाही. ज्यामुळे दुचाकी धारकांना पाणी, खड्डे, चिखलातून वाट काढून मार्गक्रमण करावे लागते. अनेक वेळा येथील गरोदर मातांना किंवा आजारी व्यक्तींना दवाखान्यात वेळेवर पोहचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. कित्येक वेळा आजारी रुग्णांना दवाखान्यात नेत असताना वाटेतच मरण पत्करावे लागले. कित्येक महिला वाटेतच प्रसूत झाल्याच्या घटना हि घडल्या आहेत. वसंतवाडी ते वडोली च्या ६ किमी रस्त्यासाठी येथील नागरिकांनी प्रशासनास अनेकवेळा लेखी निवेदन दिले, परंतु याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केले. वसंतवाडी या मागास, अतिदुर्गम, आदिवासी बहुल गावाला रस्ता बनवून देण्यासाठी शासन प्रशासन टाळाटाळ करीत आहे. 
     येणाऱ्या उन्हाळ्यापर्यंत वसंतवाडी ते वडोली या ६ किमी चा पक्का रस्ता करून देण्यात यावा, अन्यथा नाईलाजास्तव समस्त गावकऱ्यांच्या वतीने रस्त्याच्या मागणीसाठी सनदशीर मार्गाने २३ जानेवारी पासून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
विध्यार्थी नेते विकास कुडमते यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनावर दिगांबर मडावी, बळीराम मडावी, आशिष आरके, करण मडावी, शुभम मडावी, सागर आरके भुजंग मडावी, धनराज मडावी, आशीर्वाद गाडे, गजानन मेश्राम, सोनबा मार्पे, अक्षय मडावी, अक्षय मेश्राम, यांचेसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.  निवेदनाच्या प्रति जिल्हाधीकारी नांदेड, मुख्य कार्यकारी नांदेड, केंद्रीय दळणवळण मंत्री, कार्यकारी अभियंता जी.प. नांदेड, तहसीलदार किनवट, गट विकास अधिकारी प.स. किनवट याना देण्यात आल्या आहेत.