Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती*अखिल भारतीय किसान सभा* नांदेड जिल्हा समिती.

  

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती
*अखिल भारतीय किसान सभा*
      नांदेड जिल्हा समिती.

*शेती क्षेत्रा संबधित काढलेले तिन आध्यादेश मोदी सरकारचे शेतकऱ्यांना उदध्वस्त करण्याचे षडयंञ- काॅ.अर्जुन आडे*( कार्याध्यक्ष किसान सभा,महा)

*२५ संप्टेंबर रोजी देशव्यापी आंदोलन* *शेतकऱ्यांनां सहभागी होण्याचे आव्हान*

भाजपच्या केंद्र सरकारने शेती क्षेत्रा संबंधी काढलेले तीन अध्यादेश आता कायद्यात रूपांतरित होत आहेत. सरकारने काढलेल्या या अध्यादेशात शेती व शेतकरी कॉर्पोरेट कंपन्यांच्या हवाली करण्याचा डाव आहे. बाजार समित्या उध्वस्त करून, हमी भावाचे संरक्षण काढून घेऊन शेतकऱ्यांना उध्वस्त करण्यासाठी हे षडयंत्र आखले गेले आहे. भारतातील शेतकऱ्यांवर मोदी सरकारने केलेला हा अत्यंत घातक हल्ला आहे.
अखिल भारतीय किसान सभा सामील असलेल्या, 200 हून अधिक शेतकरी संघटनांचा मंच असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने
 व किसान युनियनने या तीन अध्यादेशा विरोधात आंदोलन सुरू केले आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभत आहे. 
हे अध्यादेश शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करून पंजाबच्या शिरोमणी अकाली दल या भाजपच्या आजवर मित्रपक्ष असलेल्या पक्षाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे, ही मोठी राजकीय घटना आहे.
आंदोलनाला देशव्यापी आयाम देण्यासाठी दिनांक 25 सप्टेंबर रोजी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.
अखिल भारतीय किसान सभेच्या नांदेड जिल्हा  समितीने या आंदोलनात संपूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतलाला आहे.
या देश विरोध काळ्या कायद्याच्या विरोधात ताकदीने गावा -शहरात  25 सप्टेंबरला रस्ता रोको, मोर्चे, निदर्शने या सारख्या जोरदार विरोध करण्यासाठी हजारो शेतकऱ्यांना यात भाग घ्यावा, असे आव्हान किसान सभा नांदेड जिल्हा समिती करत आहे.
         *आपले*
काॅ.अर्जुन आडे, शंकर सिडाम,किशोर पवार,खंडेराव कानडे,प्रल्हाद चव्हाण,डाॅ.डाखोरे, जनार्दन काळे,राजु पाटील, गंगाधर आरसे ,शिवाजी गायकवाड