Ticker

6/recent/ticker-posts

खेलो इंडिया मोहिमे अंतर्गत सायकलिंग खेळाडूंची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देणार ; सायकलने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी मागविली माहिती


खेलो इंडिया मोहिमे अंतर्गत सायकलिंग खेळाडूंची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देणार ; सायकलने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांनी मागविली माहिती

किनवट / तालुका प्रतिनिधी : खेलो इंडिया मोहिमे अंतर्गत सायकलिंग खेळाडूंची निवड करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन / प्रशिक्षण देण्याची कार्यवाही क्रीडा व युवक सेवा संचालनालय , महाराष्ट्र राज्य , पुणे यांचे वतीने हाती घेण्यात येणार आहे. याकरिता सायकलने ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना ईमेल द्वारे द्यावी , असे आवाहन तालुका क्रीडाधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.
                त्यानुषंगाने किनवट, माहूर, हिमायतनगर व हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषद, अनुदानित, विना अनुदानित, शासकीय आश्रम शाळा व अनुदानित आश्रम शाळा अशा सर्व  व्यवस्थापनाच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी ग्रामीण / शहरी भागातील वय वर्षे १४ ते १६ या वयोगटातील सायकलवर शाळेत ये-जा  करणाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनी यांचे संपूर्ण नाव , जन्म दिनांक , शाळेचे नांव , संपर्क क्रमांक इत्यादी माहिती जिल्हा क्रीडाधिकारी , नांदेड यांच्या dsonanded@rediffmail.com व nandedsports@yahoo.com या ई-मेल आयडीवर दि. १९ सप्टेंबर २०२० पर्यंत पाठवुन त्याची एक प्रत तालुका क्रीडाधिकारी, किनवट यांचेकडे पाठविण्यात यावी, जेणेकरुन संबंधित खेळाडूंच्या निवडीकरीता सदरची यादी क्रीडा संचालनालयास पाठविणे सोयीचे होईल. असे आवाहन तालुका क्रीडाधिकारी विलास चव्हाण व गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले आहे.