गावातील केरकचरा, घाण व नाल्या साफ करून ग्रामपंचायत प्रशासनाने डेंगू वा तत्सम आजारापासून नागरिकांचे रक्षण करावे
-सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार
• गोकुंदात रस्त्यावर उतरून नागरिकांना केले सजग
किनवट /तालुका प्रतिनिधी : शनिवार (दि.२६ ) सकाळी १० ची वेळ... ग्रामसेक, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता यांना भ्रमणध्वणी संदेशाने प्रकल्पकार्यालयात बोलावून घेऊन... सहायक जिल्हाधिकारी म्हणतात : किनवट शहरालगत गोकुंदा सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेलं गाव आहे... येथे सांडपाणी व्यवस्था, कचरा विल्हेवाट काय स्थिती आहे ?
ग्राम पंचायत यंत्रणा म्हणते : दररोज साफ सफाई करून कचरा उचलला जातो .
सहा. जिल्हाधिकारी : ... चला माझ्या सोबत आपण गावभ्रमण करूयात...
सहा. जिल्हाधिकारी सर्व लवाजम्यांस पेट्रोल पंपाजवळ आणतात ... विचारतात : मग हे काय ? इथे हा कचऱ्याचा ढीग कसा काय ? या दुकानासमोर हा कचऱ्याचा पुंजाना कसा ? ही बघा नाली सर्व प्लास्टिक रॅपर्सनी पूर्ण भरून गेली, नाली ब्लॉक झाली तर सांडपाणी वाहून जाईल कसे ? यामुळेच तर डेंगू सारखा आजार वाढतो ... फर्निचर मार्ट, हॉटेल व जनरल स्टोअर्स चालकांना बोलावून म्हणतात ... हे बघा आपल्या दुकानातील केरकचरा आपण रस्त्याच्या कडेला, नालीत टाकतो, हे योग्य नाही, त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे आपली जबाबदारी आहे, प्रत्येक दुकानदारांनी दुकानासमोर डस्टबीन ठेवा, त्यात कचरा जमा करा, ग्राम पंचायतीची घंटागाडी तो कचरा उचलून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावेल. ... ही वार्निंग आहे, भविष्यात असं चित्र दिसल्यास दंड भरावा लागेल...
सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार हे आय.ए.एस. अधिकारी रस्त्यावर फिरून केरकचऱ्याची, घाणीनं भरलेल्या तुटूंब नाल्यांची ही बकाल अवस्था दाखवत होते. सर्वच जण हवालदिल झाले होते. नागरिक तर अचंबित.
शहराला लागून असलेल्या गोकुंदा ग्रामपंचायती क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर ही स्थिती आहे. तर अंतर्गत वस्तीत काय अवस्था असेल , याची कल्पना केलेलीच बरी, तेव्हा किनवट व माहूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच वा पदाधिकारी यांनी आपल्या गावातील सर्व नाल्या ह्या सांडपाणी वाहून नेण्यासाठी साफ कराव्यात तसेच घाण, केरकचरा रस्त्यावर इतरत्र अस्ताव्यस्त दिसू नये यासाठीच्या उपाय योजना कराव्यात. कोरोनाच्या प्रादुर्भावाने हवालदिल झालेल्या नागरिकांचे डेंगू वा तत्सम आजारापासून रक्षण करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार यांनी केले.
यावेळी उपसरपंच शेख सलीम, ग्राम पंचायत सदस्य उमेश पिल्लेवार, ग्रामसेवक अशोक चव्हाण, उत्तम कानिंदे, लक्ष्मीकांत ओबरे, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता उपस्थित होते.
" एक आय.ए.एस. अधिकारी रस्ते, नाल्या, घाण, सांडपाणी, कचरा या महत्वपूर्ण विषयावर ग्रामपंचायतीचे ग्रावसेवक व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांचे लक्षवेधून घेतो. त्यामुळे आता नागरिकांनी सुद्धा सतर्कता बाळगावी इतरत्र केरकचरा फेकू नये , कचरा कुंडीत जमा करावा.
- मिलिंद धावारे, सामाजिक कार्यकर्ता, गोकुंदा
" गोकुंदा ग्राम पंचायती अंतर्गत अनेक नगरात आजही नाल्या, विद्युत दिवे पोहचले नाहीत, तसेच नियमीत साफसफाई होत नाही, दत्तनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकवीरा मंदीराजवळ नेहमी पाणी असतं,