Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमात सहभागासाठी वेब पोर्टलवर शाळांनी नोंदणी करावी-गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने


राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमात सहभागासाठी वेब पोर्टलवर शाळांनी नोंदणी करावी
-गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने

किनवट/ तालुका प्रतिनिधी : संसदीय लोकशाहीची विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक होणे करिता देशातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमधून सदर उपक्रम राबविण्याचे घोषित करण्यात आले आहे . याकरिता राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमातील सहभागासाठी इयत्ता नववी ते बारावी चे वर्ग असलेल्या सर्व शासनमान्य शाळांनी  वेबसाईट पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी केले आहे . 
            राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेचे संचालक यांनी ता.14 सप्टेंबर रोजी (जा.क्र.1653 ) पत्राद्वारे असे कळविले की, दिनांक 26 नोव्हेंबर 2019 रोजी संविधान दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त महामहिम राष्ट्रपती महोदयांनी राष्ट्रीय संसद योजनेचे वेब पोर्टल सुरू केले आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयाकडून संसदीय लोकशाहीची विद्यार्थ्यांमध्ये रुजवणूक होणे करिता देशातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमधून सदर उपक्रम राबविण्याचे घोषित करण्यात आले आहे . याकरिता राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमातील सहभागासाठी राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या शासनमान्य सर्व शाळांनी www.nyps.mpa.gov.in या वेबसाईट पोर्टल वर दिनांक 31 डिसेंबर 2020 पर्यंत नोंदणी करण्यास मुदतवाढ दिलेली आहे . 
            तालुक्यातील शासनमान्य इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या सर्व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी आपल्या शाळेची वेबसाईट पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी. नोंदणी केल्यानंतर सहभागी शाळेतील विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व शिक्षक मुख्याध्यापक यांना उत्तेजनार्थ प्रमाणपत्र मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत दिले जाणार आहे. 
                 सर्व  माध्यमिक शाळांनी वेबसाईट पोर्टलवर नोंदणी केल्याचा अहवाल, सहभागी विद्यार्थी संख्या , 1 किंवा 2 फोटो दरमहा  diecpdnanded@maa.ac.in या मेल आयडीवर द्यावेत, असे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नांदेडचे प्राचार्य डॉ. रविंद्र अंबेकर यांनी कळविले आहे असे तालुका संपर्क अधिकारी तथा डायटचे अधिव्याख्याता अभय परिहार व गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी सांगितले.