मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सुप्रसिध्द गझलकार साहित्यीक (सन्मित्र) चंद्रकांत कदम नादेंड यांची रचना वाचुया
*मराठवाडा...*
〰〰〰〰〰〰〰〰
आहे जसा अगोदर होता मराठवाडा
अवघ्या गुणीजनांचा खोपा मराठवाडा!
ना धावली कधीही येथे विकासगंगा
ना वाटला कुणाला मोका मराठवाडा!
दुष्काळ सोसुनीही शाबूत भान त्याचे
झाला कधीच नाही खोटा मराठवाडा!
त्याच्या तनामनावर अधिराज्य गाजवाया
नव्हता अजून नाही सोपा मराठवाडा!
थकला कधीच नाही झेलून वादळांना
अस्वस्थ काळजाचा ठोका मराठवाडा!
आहे नसानसातुन विद्रोह पेटलेला
समजू नका कुणीही छोटा मराठवाडा!
युद्धात अन लढ्यातुन हौतात्म्य पत्कराया
झाला कधीच नाही कोता मराठवाडा!
आयुष्यभर उन्हाच्या सोसून काहिलीला
झाला जणू व्यथांचा झोका मराठवाडा!
जपतो इमानदारी अप्रूप ना कशाचे
आहे नभाहुनीही मोठा मराठवाडा!
*@ चंद्रकांत कदम (सन्मित्र)*
*नांदेड*
*मो.9921788961*
〰〰〰〰〰〰〰〰