Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता.प्र दि ८ इंडस या मोबाईल टॉवरचे व्यवस्थापन करणा-या कंपनी ने त्याच्या देखभाली करिता आऊटसोर्सिंग केलेली आहेकारण एकदा चालु केल्यावर कोणत्याही परिस्थितीत मोबाईल नेटवर्क बंद करता येऊ


किनवट (ता.प्र आज की न्यूज़) दि ८ इंडस या मोबाईल टॉवरचे व्यवस्थापन करणा-या कंपनी ने त्याच्या देखभाली करिता आऊटसोर्सिंग केलेली आहे म्हणजे सुरक्षा रक्षक, डिझेल पुरवठादार, तंत्रज्ञ, देखभाल या सर्व बाबी करिता विविध कंपनी कडुन मनुष्यबळ भाडेतत्वावर घेतलेले आहे. या प्रकारे मोबाईल टॉवरचे व्यवस्थापन केले जाते तर याच विविध प्रकारच्या करारतत्वावर कामे करणा-या आऊटसोर्सिंगच्या कर्मचा-यांनी इंडस या कंपनी सोबत चालु असलेल्या त्यांच्या वादामुळे व विविध मागण्या पुर्ण करण्या करिता बेकायदेशीर रित्या मोबाईल चे टॉवर बंद करुन नागरीकांना वेठीस धरले आहे यात काही गुंड प्रवृत्तीचे तत्व समाविष असल्यामुळे किनवट शहरासह तालुक्यातील मोबाईल नेटवर्क कोलमंडले होते तर एका कर्मचा-यांने सांगितले कि हा बंद तिन जिल्ह्यांना प्रभावित करत आहे परंतु मोबाईल नेटवर्क आजच्या काळात अत्यावश्यक सेवेत मोडत आहे व अशा अतीमहत्वाच्या बाबी बद्दल शासन दरबारी अशा प्रकारची बेजबाबदारी ही अत्यंच चिंताजनक विषय आहे.
      कोरोना काळात जर रुग्नाला संपर्क साधायचा असेल तर मोबाईल नेटवर्क हा एकमेव साधन आहे अशा परिस्थितीत नागरीकांना संपर्क साधण्याकरिता आवश्यक बाब असतांना एवढ्या गंभीर बाबी कडे दुर्लक्ष करणे हे प्रत्येकाला महागात पडु शकते.
      कारण एकदा चालु केल्यावर कोणत्याही परिस्थितीत मोबाईल नेटवर्क बंद करता येऊ शकत नाही या करिता शासनाच्या विविध विभागाच्या परवानग्या लागतात कारण हा विषय देशाच्या व राज्याच्या सुरक्षेशी थेट जोडला गेलेला असतो. अशी संवेदनशील यंत्रणा जर आऊटसोरसिंग कर्मच-यांच्या हाती असेल आणी ते केव्हाही बंद करुन शकत असतील तर या देशात माहिती तंत्रज्ञाना विषयी बनवण्यात आलेल्या कायद्याचे ज्ञान सर्वसामान्यांना तर सोडा जिल्हा प्रशासनात बसलेल्या
अधिका-यांना देखिल आहे कि नाही हा प्रश्न निर्माण होत आहे. कारण कोणीही येतो आणी अशा प्रकारे आंदोलन करतो आणी सर्वसामान्य नागरीकांना वेठीस धरतो हे चुकीचे आहे सध्यास्थितीत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने अनेक नागरीकांचे नातेवाईक हे विविध रुग्णालयात दाखल आहेत त्यामुळे त्यांचा एकमेकांना संपर्क साधन्याकरिता मोबाईल हा एकमेव साधन आहे अशा गंभीर परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे प्रशासन जर या अतिमहत्वपुर्ण यंत्रणेवर नियंत्रण ठेवत नसेल तर कारभार कोणाच्या भरवशावर चालु आहे याचा विचार न केलेले बरे अशी भावना सर्व सामान्य नागरीकांच्या मनात निर्माण झाला आहे.
      कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झाल्याने लॉकडाउन सुरु करण्यात आले यामुळे अनेकांचा रोजगार हरवला आहे अशा स्थितीत नेटवर्ग बंद राहणे म्हणजे अनेकांच्या कामावर याचा परिणाम झाला आहे यामुळे बेरोजगारी वाढवण्यास प्रशासन हातभार लावत आहे अशा नागरीकांचा आरोप आहे.