Ticker

6/recent/ticker-posts

वाहन चोरी करणाऱ्या ७ सराईत चोरांना अटक,८ दुचाकी वाहने जप्त; गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई .



पुणे लोणीकंद (नितीन कालेकर) : वाहन चोरी  करणाऱ्या सात सराईत चोरांना गुन्हे शोध पथका च्या पोलिसांनी अटक केली आहे. 

अटक केलेल्या चोरट्यांकडून २,७५,००० रुपये किंमतीच्या एकूण ०८ दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहेत..

अक्षय विजय सूर्यवंशी (वय २३ वर्षे, रा. लोणीकंद, ता हवेली, जि पुणे), अजय दीपक चव्हाण (वय ३० वर्षे, रा लोणीकंद, ता हवेली जी पुणे), गणेश हनुमंता मंगवडे (वय ३० वर्षे, रा लोणीकंद, ता हवेली, जी पुणे), रशीद मेहबूब शेख (वय २० वर्षे, रा बारली,मुखेड,जी नांदेड), 

निलेश लिंबराज आडमुठे (वय २६ वर्षे, रा आष्टापुर, त हवेली, जी पुणे), सलमान बाबु शेख (वय ३० वर्षे, रा पेरणे फाटा), रियाझ मेहबूब शेख (वय २९ वर्षे, रा कोरेगाव भीमा, तां शिरूर , जी पुणे) अशी वाहन चोरी करणारे आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सद्या वाहन चोरीच्या गुन्हांचे प्रमाण वाढत असल्याने लोणीकंद पोलीस सदर गुन्ह्याचा व आरोपींचा गुन्हे शोध पथक शोध घेत होते.  सोमवार ( दि. २७ सप्टेंबर) रोजी लोणीकंद पोलीस पेट्रोलिंग करीत असताना  लोणीकंद, कोलवडी परिसरातून सदर  ७ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडून २,७५,००० रुपये किंमतीच्या एकूण ०८ दुचाकी  जप्त करण्यात आल्या आहेत.आरोपीकडून लोणी काळभोर, हडपसर, वानवडी, निगडी या पोलीस स्टेशनचे एकूण ०५ गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक केलेल्या आरोपींपैकी अक्षय सूर्यवंशी याच्यावर इंदापूर,, बंडगार्डन, पुणे रेल्वे, भोसरी या ठिकाणी वाहन चोरी व इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच गणेश मंगवडे यचेवर देखील यापूर्वी जबरी चोरी व इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर सलमान शेख याचेवर चोरी व जबरी चोरीचे एकूण १० गुन्हे दाखल आहेत. आरोपींना मा कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


 
सदरची कामगिरी डॉ. अभिनव देशमुख सो (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण), विवेक पाटील (अप्पर पोलीस अधीक्षक, पुणे विभाग),  .डॉ सई भोरे पाटील (उपविभागीय पोलिस अधिकारी, हवेली विभाग) , प्रताप मानकर (पोलीस निरीक्षक) या वरिष्ठांच्या मार्ग दर्शना खाली गुन्हे शोध पथक – पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, नवजीवन जाधव, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, बाळा तनपुरे, नितीन मोरे, मारुती दुबळे यांनी केली आहे.