Ticker

6/recent/ticker-posts

वाई बाजार येथील ग्राम विकास अधिकारी राजेंना गुंडमवार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात


वाई बाजार येथील ग्राम विकास अधिकारी राजेंना गुंडमवार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात!

नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी मागितली होती दहा हजाराची लाच

माहूर :- तालुक्यातील वाई बाजार येथील ग्राम विकास अधिकारी राजेंना गुंडमवार यांना सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले ग्रामपंचायत कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवार दिनांक 25 रोजी सापळा रचून पडकले.

वाई बाजार तालुका माहूर येथे सार्वजनिक वाचनालय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेले ग्रामपंचायत कार्यालयाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदार कडून लोकसेवक ग्राम विकास अधिकारी राजेंना गुंडमवार, वय 53 वर्ष,यांनी 10 हजार लाचेची मागणी केली

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 24 रोजी रितसर तक्रार केली होती.आज दिनांक 25 रोजी लाच लुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कपिल पुंजाराम शेळके, जगन्नाथ अनंतवार,गणेश केजकर,विलास राठोड,नरेंद्र बोडके या लाच लुचपत विभागाच्या टीमने सापळा रचला.

या सापळ्यात दहा हजारा पैकी ठरवल्याप्रमाणे पहिला टप्पा पाच हजार रुपये ईतकी लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना ग्राम विकास अधिकारी राजेंना गुंडमवार यांना लाचलुचपत विभागाने पकडले.या कार्यवाहीमुळे माहूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.