Ticker

6/recent/ticker-posts

परभणी कलावंतांची नगरी - तुकाराम रेंगेपरभणी( जि. प्र .) परभणी कलावंतांची नगरी असून परभणीकर कलावंतांनी महाराष्ट्रभर आपली ओळख निर्माण केली


परभणी कलावंतांची नगरी
                   -  तुकाराम रेंगे
परभणी( जि. प्र .) परभणी कलावंतांची नगरी असून परभणीकर कलावंतांनी महाराष्ट्रभर आपली ओळख निर्माण केली.अजमत खान दिग्दर्शीत एक थेंब प्रेमाचा या लघुपटाला नवादा आंतरराष्ट्रीय फिल्मफेअर फेस्टिवल स्पर्धेत  अव्वल दर्जाचे मानांकनासह प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याने दिग्दर्शकासह कलावंतांच्या सत्कार प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खा. तुकाराम रेंगे पाटील यांनी गौरवोद्गार काढले.
  परभणी जिल्हा काँग्रेस च्या वतीने परभणी शहर अध्यक्ष नदिम इनामदार यांनी आयोजित सत्कार प्रसंगी अध्यक्षीय समारोपात तुकाराम रेंगे पाटील बोलत होते.या वेळी दिग्दर्शक अजमत खान,सिनेकलावंत अरुण मराठे,सौ.विजया कातकडे,सईद अन्सारी, बाबुराव सायन्ना ,दिनकर तायडे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.व्यासपीठावर तुकाराम रेंगे ,नदिम इनामदार,विशाल बुधवंत,अरुण मराठे,सत्तार पटेल,अतिक इनामदार, शमी मोईन्नोद्दिन,खदिर लाला,साबेर मुल्ला,असलम खान,एकताचे संस्थापक अजमत खान ,इंजि.जाविद  मानवी हक्क अभियान जिल्हाध्यक्ष पप्पू शेळके आदींची उपस्थिती होती.
  नदिम इनामदार यांनी अजमत खान व सर्व कलावंतांना शुभेच्छा देत भविष्यात परभणीचे नाव कलानगरी होईल असा आशावाद व्यक्त केला.मनपा सभापती विशाल बुधवंत यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत अजमत खान यांच्यातील कला कौशल्याचा वेध घेतला.अरुण मराठे यांनी चित्रपटा विषयी भूमिका मांडत अजमत खान यांच्या बहुआयामी व्यक्तीत्वाचा वेध घेतला.
    अध्यक्षिय समारोपात अजमत खान हे उत्तम दिग्दर्शक असून त्यांना कले विषयी आणि कलावंतान विषयी उत्तम जाण आहे.एक थेंब प्रेमाचा या चित्रपटाला कला आणि संस्कृतची जोड देत लोकादर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन करित चित्रपटाला विशेष मदती साठी राज्याच्या सांस्कृतिक मंत्र्यालयाकडे शिफारस करणार असल्याचे विदीत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एकता सेवाभावी संस्था, परभणी जिल्हाध्यक्ष प्रा.अरुण पडघन यांनी केले.