Ticker

6/recent/ticker-posts

‘मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत…’; उदयनराजेंनी सरकारकडे केल्या ‘ह्या’ मागणी



मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रकरण खंडपीठाकडे पाठवून सध्या लागू असलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजासाठी विशेष योजना लागू करा, अशी मागणी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्या. जेणेकरुन मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. स्थगिती मिळाल्यावर उदयनराजे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.


 
मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत सरकार कधीच गंभीर नव्हतं. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा लागत आहे. मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो. मी तुमच्या सोबत आहे, असं उदयनराजेंनी म्हटलं होतं.

दरम्यान, मराठा आंदोलनाला स्थगिती मिळाल्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने न घेतल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

उदयनराजेंनी केल्या या मागण्या…
1. प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावी.

2. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या मराठा विद्यार्थ्यानां ‘स्वयं’ योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना लागू करा.

3.गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळांत प्रवेश मिळावा.


 
4. ग्रामीण भागातील बेघर मराठा कुटुंबांना घरे मिळावीत.


 
5.सारथी संस्था सक्षम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1000 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा.

6. बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परिक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी सवलती सारथीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्या.

7. मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परिक्षेसह इतर परिक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू कराव्या.

8.मराठा समाजातील युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलीस भरतीसाठी आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षणाची सुविधा प्रत्येक जिल्ह्यात सुविधा उपलब्ध करून द्यावी.

9.ग्रामीण भागातील शेतकऱ्यानां शेतीपूरक व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजना लागू करावी. शेती आणि शेतकरी कुटूंबास विमा संरक्षण द्यावे.

10. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा.

दरम्यान, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलून ठोस कृती करावी. अन्यथा मराठा सामाजाच्या रोषाला सामोरे जावे. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत वरील मागण्यांसह इतर समाजाप्रमाणे मराठ्यांसाठी बिनव्याजी कर्जाच्या योजना सुरू करून त्यानां छोट्या उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे. तसेच बेरोजगार तरूण-तरूणीनां भत्ता सुरू करावा, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.
हैलो दोस्तों, यूट्यूब चैनल *aaj ki news kinwat में 
 हमारे विडीयो को 👍 लाईक कीजिए, 👉 शेयर कीजिए  *कमेंट्स* 🖊में आपकी प्रतिक्रिया देकर हमारे चैनल *आज की न्युज किनवत* को *सब्सक्राइब* कीजिए। ओर दोस्तों 🔔 *बेल आइकॉन* को प्रेस करना ना भूलें ताकी हमारे नए वीडियोज़🎬 कि अपडेट आपको मिलती रहे
नितीन मधुकर कालेकर आज् की न्युज जिल्हा प्रतिनिधी पुणे
जाहिरातीसाठी सम्पर्क-8551888031