*जातीयवादी घाणेरडे राजकारण, विकृत मानसिकता, हिटलरशाही सद्या आपला भारत देश असा दिसत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून सर्वाना समान हक्क, लोकशाही माणूस म्हणून जगण्या चा मार्ग दाखवून दिला, पण आता हे चित्रच बदलत आहे, तरुण पिढी भारताचे आधार स्तंभ काय करत आहेत तर
भारत देशाला आतून पोखरून काढत आहे. आज एक स्त्री म्हणून जगता ना माझ्या कोणत्याच बहिणीला या आपल्या स्वतंत्र भारतात सुरक्षित वाटत असेल का, तर नाहीच कारण दर दोन दिवसाला इथे अगणित बलात्कार घडत आहे, शारीरिक, मानसिक छळ. का आशा नराधमांना दिसताच क्षणी गोळी मारण्याचा अधिकार नाही. आम्हला तो अपराध करून निघून जातो, माझी बहिण, तुमची बहीण, मुलगी ती, तिची आत्मा, तिचे कुंटुब न्याय मागत राहतो आणि तो अपराधी निरपराध सुटतो. तोच दुसरा राक्षस पुन्हा एकीची अब्रु लुटण्यासाठी तयारच. एका मुलीवर बलात्कार झाला मग ती कोणत्या जातीची धर्माची आहे हे पाहण्या पेक्षा ती एक स्त्री आहे हे एवढं च पुरेस आहे माझ्या साठी न्याय मिळवून देताना स्त्री ही स्त्री ची च शत्रू नसावी, त्यात राजकारण, पैसा किंवा स्वतः च स्वार्थ या गोष्टी जर मध्ये येत असतील तर माझ्या बहिणीला कधी च न्याय मिळणार नाही, आधी तर कोणताही नाराधम आपल्या कडे घाणेरड्या नजरेनी च पाहण्या आधी च आपल्या त महाकाली जागृत झालीच पाहिजे मैत्रिणीनो. येणाऱ्या काळात या अशी घटना अख्या भारत देशात काय जगात कुठेही घडली नाही पाहिजे. या साठी आपली स्त्री शक्ती जागृत होणं गरजेचं आहे. फक्त मेणबत्ती पेटवून किंवा रॅली काढून अर्ज दाखल करून काहीच होनार नाही. चला तर माझ्या सर्व रणरागिणी, दामिनी,महाकाली, आता ही लढाई आपल्या अस्तित्वाची, आत्मसन्माना ची आहे,आणि ती आपल्या ला जिंकायला च हवी पुन्हां एकदा आपल्या ला झाशी ची राणी व्हावच लागणार, तरच आपलं अस्तिव टिकून राहणार आहे, नाही तर इतिहास जमा होऊ आपण. पुन्हा आता न्याय मागणे नकोच हा अन्याय च आपल्या वर घडू नये या साठी च आपन तयार होऊ. ।दुर्बल। लाचार नाही मी तर ,धारदार तलवार आहे ,अन्याय सहन करणे च काय तर ,अन्याय पाहणे च माझ्या रक्तात नाही,कारण मी आजची महाकाली आहे.*
*जयश्री भरणे.*