Ticker

6/recent/ticker-posts

पुणे. विषय: भिमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान आणि कबिर


पुणे. विषय: भिमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा अभियान आणि कबिर
कला मंचाचे शाहिर सागर गोरखे, ज्योती जगताप,
रमेश गायचोर, यांचे तात्काळ सुटका करणे बाबत.
महोदय,
आम्ही संघटनचे कार्यकर्ते आपणांकडे मागणी करत आहोत की,
भिमा कोरेगाव दंगलीस जबाबदार धरून बेकायदेशीररित्या अटक
केलेल्या वरील कार्यकर्त्याची तात्काळ सुटका करावी.
२)
सदर दंगलीस जबाबदार असणाऱ्या मनोहर भिडे आणि मिलींद
एकबोटे या खऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी.
३)
भिमा कोरेगाव प्रकरणात यापूर्वी अटक केलेल्या सर्व मानव अधिकार
कार्यकर्ते, विचारवंत, वकिल आणि कलाकार यांची बिनशर्त सुटका
करण्यात यावी.
४)
भिमा कोरेगाव प्रकरणाची निपक्ष चौकशी करण्यासाठी राज्य
सरकारच्या अखत्यारीत एस.आय.टी.ची तात्काळ स्थापना करण्यात
यावी.याआशयाचे निवेदन इनक्रेडिबल समाजसेवक गृप तर्फे पुणे जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी एन ए पी एम चे संघटक इब्राहिम खान, इनक्रेडिबल समाजसेवक गृप चे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान. राज फैय्याज, कबिर शेख, विष्णू कांबले तसेच कबिरकला मंचचे पदाधिकारी, भिमा कोरेगाव शौर्यदिन प्रेरणा आभियानाचे पदाधिकारी आणी इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. 
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳