Ticker

6/recent/ticker-posts

BREAKING ब्रेकिंग न्यूज ,,,, हरणाची शिकार करणाऱ्या तीघेजण ताब्यात

BREAKING ब्रेकिंग न्यूज ,,,, हरणाची शिकार करणाऱ्या तीघेजण ताब्यात  हिमायतनगर तालुक्यात हरणाची शिकार करणारी टोळी सक्रिय झाली असून, वडगाव तांडा शिवारातुन दोन हरणाची हत्या करून मांस घेऊन पलायन करणाऱ्या तिघांना रात्र गस्त घालणार्या तरूणांनी पकडुले आहे, या घटनेने वन्य प्राण्यांची शिकार करणार्या शिकार्यामध्ये खळबळ उडाली आहे. या आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, सदर घटनेचा पंचनामा वनपरिक्षेञ अधिकारी संध्याताई डोके,पशुवैद्यकीय अधिकारी आणि  वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी केला आहे. नांदेड न्यूज लाईव्हने यापूर्वी अनेकदा हरणाची शिकार करणारी टोळी सक्रिय या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून प्रशासकीय यंत्रणेला कुतकर्णी झोपेतून जागृत करण्याचा प्रयत्न केला, मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष जगले, परिणाम आज हरणाची शिकार करून मास घरून जाणाऱ्या तिघांना युवकांनी पकडुन दिल्यानं हा प्रकार उघडकीस आला आल्यानं आज की न्यूज लाईव्हने प्रकाशित केलेलं वृत्त खरे होते हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे, आता या टोळीचा पर्दाफाश करण्यात वनविभाग किती तत्परता दाखवते याकडे वन्यप्रेमी नागरिकांसह तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.