किनवटमध्ये आज 1 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी, 1 बाधिताची भर
किनवट / तालुका प्रतिनिधी : रविवार 18 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या
कोरोना अहवालानुसार तालुक्यातील 1 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी दिली तर 1 बाधिताची भर एँटिजेन तपासणीद्वारे पडली.
त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 551 झाली आहे.
आजपर्यंत 481 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आजचा 1 बाधित हा गोकुंदा येथील रुग्ण आहे.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 6, कोविड केअर सेंटर,
किनवट येथे 9 व होम क्वारंटाईन 15 अशा एकूण 30 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेंनी घाबरू नये,
शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या,
असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता.18/10/2020 सायंकाळी 06.00 वाजता
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 730,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-607,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
ऍन्टिजन टेस्ट-2,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 1,
निगेटिव्ह अहवाल-1,
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-1,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -551,
आज सुटी दिलेले -1
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-481,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15 (15 होम क्वारंटाईन)