किनवटमध्ये औषधोपचारानंतर 1 बरा, 6 बाधितांची भर
किनवट / तालुका प्रतिनिधी : शुक्रवार ता.23 ऑक्टोंबर 2020 रोजी रात्री 20.59 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार तालुक्यातील 4
बाधितांची भर आरटीपीसीआर व 2 एँटिजेन तपासणीद्वारे पडली.
त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 568 झाली आहे. आजपर्यंत 484 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
आजचे 6 बाधित हे किनवट शहरातील 5 व सालाईगुडा येथील 1 रुग्ण आहे.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 7, कोविड केअर सेंटर,
किनवट येथे 11 व होम क्वारंटाईन 9 अशा एकूण 27 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या,
असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवट तालुक्याचा कोरोना विषयी संक्षिप्त अहवाल
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 757,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-634,
आज घेतलेले स्वॅब - 5,
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-04
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
ऍन्टिजन टेस्ट- 28,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-2,
निगेटिव्ह अहवाल- 26,
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-6,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -562,
आज सुटी दिलेले - 1,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-484,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-18 ( 9 होम क्वारंटाईन)