किनवटमध्ये आज 15 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी, 5 बाधितांची भर
किनवट / तालुका प्रतिनिधी : बुधवार 7 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार तालुक्यात 15 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे
एँटिजेन किट्स तपासणीद्वारे 5 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.
त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 529 झाली आहे. आजपर्यंत 468 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आज किनवटच्या येथील 1, गोकुंदा येथील 2 व मांडवी येथील 3 अशा एकूण 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 4, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 7 व होम क्वारंटाईन 16 अशा एकूण 27 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता. 07 /10/2020 सायंकाळी 06.00 वाजता
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 711,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब- 595,,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
ऍन्टिजन टेस्ट -37,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या-5,
निगेटिव्ह अहवाल -32,
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-5,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -529,
आज सुटी दिलेले -15,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-468,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-11 (16 होम क्वारंटाईन)