किनवटमध्ये आज 18 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी, 14 बाधितांची भर
किनवट / तालुका प्रतिनिधी : शनिवार ता.24 ऑक्टोबर 2020 रोजी
सायंकाळी 6 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार आज 18 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी दिली तर
एँटिजेन तपासणीद्वारे तालुक्यात 14 बाधितांची भर पडली आहे.
त्यामुळे आता बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 582 झाली आहे.
आजपर्यंत 502 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
आजचे 14 बाधित हे किनवट शहरातील 12, गोकुंद्यातील 1 व
गोंडवडसा (ता. माहूर ) येथील 1 रुग्ण आहेत.
बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 7, कोविड केअर सेंटर,
किनवट येथे 5 व होम क्वारंटाईन 11 अशा एकूण 23 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या,
असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
किनवट तालुक्याचा कोरोना विषयी संक्षिप्त अहवाल
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 757,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-634
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7,
ऍन्टिजन टेस्ट- 24,
आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 14,
निगेटिव्ह अहवाल-12,
आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-14,
आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -582,
आज सुटी दिलेले -18,
रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या- 502,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-12 ( 11 होम क्वारंटाईन)