Ticker

6/recent/ticker-posts

सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण एच.पूजार, भाप्रसे यांच्या हस्ते 19 लाभार्थींना वनहक्क प्रमाणपत्र प्रदान



सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण एच.पूजार, भाप्रसे यांच्या हस्ते 19 लाभार्थींना वनहक्क प्रमाणपत्र प्रदान


किनवट / तालुका प्रतिनिधी : 'अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी 
( वन हक्काची मान्यता ) 

अधिनियम 2006, 2008, 2012 ) " अंतर्गत तालुक्यातील एकोणवीस लाभार्थींना 

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी व उप विभागीय वनहक्क समितीचे अध्यक्ष कीर्तीकिरण एच.पूजार, भाप्रसे यांच्या हस्ते वन हक्क प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
         

      मागील पिढीपासून अनेक हालअपेष्टा सहन करत जंगल जमिनीवर उदरनिर्वाह करणाऱ्या 

आदिवासी,वननिवासी दावेदारास विनाविलंब वनहक्क प्राप्त करून याद्वारे त्यांचे 

आर्थिक जीवनमान उंचाविण्यासाठी " पारंपारिकरित्या वनांवर किंवा वनजमिनीवर खर्‍याखुर्‍या गरजांसाठी किंवा उपजीविकेसाठी 

अवलंबून असणाऱ्या आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी समूहांवरील ऐतिहासिक अन्याय दूर करावा, 

वनहक्कांना कायदेशीर मान्य करण्याबरोबरच त्यांच्यात जंगलातील 

जैवविविधता संरक्षणासंबंधी कर्तव्याची जाणीव निर्माण करावी, अशी वनहक्क कायद्यात तरतूद आहे.

 याचे तंतोतंत पालन करून वन हक्क मान्य करून त्यांना वनहक्क प्रमाणपत्र

 भूमिअभिलेख कार्यालयाकडून मोजणी व सातबारा प्रदान करण्यात आले

 या प्राप्त झालेल्या प्रमाण पत्राच्या आधारे त्यांना आता विविध शासकीय 

विभागाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. यावेळी तहसिलदार उत्तम कागणे, 

नायब तहसिलदार व्ही.टी. गोविंदवार, सर्वेश मेश्राम, माधव लोखंडे

समन्वयक के.एम. पटणे, मास्टर ट्रेनर उत्तम कानिंदे, एस.व्ही. कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


वनहक्क लाभार्थी ( कंसात त्यांचे गाव ) : 

बाबाराव लक्ष्मण चिरामाडे (बोधडी बु), सुभाष धोंडिबा देशमुख (सावरगाव तांडा), धोंडीबा दत्ता किरवले, 

पुंजाजी गोमाजी डोखळे, विठ्ठल माधव 

वानोळे, परमेश्वर सदाशिव मुरमुरे, रामराव जळबाजी खंदारे वारस चंद्रकलाबाई रामराव, 

अंबाजी जळबाजी मेंढे वारस नागाबाई अंबाजी (सर्व सावरगाव ),

 यशवंत तुकाराम चाकोते, नामदेव तुकाराम चाकोते (रिठा), जयवंताबाई 

रामजी धनवे, पांडुरंग ग्यानबा तोरकड, सटवाजी पुंजाजी बेले ( कुपटी बु ), सदाशिव सटवाजी झाटे, 

निलाबाई मारुती देशमुमे, थामाजी भिवाजी देशमुखे, सटवाजी सखाराम देशमुखे (थारा ), 

गणपती रामराव खोकले (दिग्रस/थारा ) व हासेन्ना गंगाराम गड्डमवार (नंदगाव )