Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये आज 2 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी, 1 बाधिताची भर



किनवटमध्ये आज 2 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी, 1 बाधिताची भर


किनवट / तालुका प्रतिनिधी  : सोमवार 19 ऑक्टोंबर 2020 रोजी रात्री 23.27 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 


तालुक्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी दिली तर 1 बाधिताची भर एँटिजेन तपासणीद्वारे पडली. 
        

        त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 552 झाली आहे. 

आजपर्यंत 483 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आजचा 1 बाधित हा बोधडी (बु) येथील रुग्ण आहे.
       
    बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 5, कोविड केअर सेंटर,


 किनवट येथे 10 व होम क्वारंटाईन 13 अशा एकूण 28 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन 

वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता.19/10/2020 रात्री 23. 27 वाजता

आरटीपीसीआर टेस्ट
आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 730,

आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-607
आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-0,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजन टेस्ट- 42,

आज रोजी एँटिजेन पॉझिटीव्ह संख्या- 1,
निगेटिव्ह अहवाल- 41,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-1,


आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,

आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -552, 

आज सुटी दिलेले -2,

रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-483,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15 (13 होम क्वारंटाईन)