Ticker

6/recent/ticker-posts

किनवटमध्ये आज 2 बाधितांची भर



किनवटमध्ये आज 2 बाधितांची भर

किनवट / तालुका प्रतिनिधी  : शनिवार 17 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या 

कोरोना अहवालानुसार तालुक्यातील 2 व्यक्ती आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित आढळले. 
                

त्यामुळे आता  बाधित रूग्णांची आजपर्यंतची एकूण संख्या 550 झाली आहे. 

आजपर्यंत 480 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. बाधितांपैकी प्रधानसांगवी 1 व गोकुंदा 1 असे एकूण 2 रुग्ण आहेत.
           

बाधितांपैकी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर, 

उप जिल्हा रुग्णालय, गोकुंदा येथे 8, कोविड केअर सेंटर, किनवट येथे 8 व होम क्वारंटाईन 15 अशा एकूण 31 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 


जनतेंनी घाबरू नये, शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या, असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
                शुक्रवार दि. 16 ऑक्टोबर रोजी 4 कोरोना बाधितास औषधोपचारानंतर सुटी दिली. तर 

किनवट शहरातील 1 व गोकुंदा येथील 1 अशा 2 व्यक्तींचा अहवाल ऍटिजेन तपासणीत बाधित आला होता.
           

किनवट तालुक्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
ता. 17/10/2020 सायंकाळी 06.00 वाजता



आजपर्यंत घेतलेले एकूण स्वॅब- 730,
आजपर्यंतचे निगेटिव्ह स्वॅब-607

आज आरटीपीसीआर पॉझिटिव्ह संख्या-2,

स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 7, 


ऍन्टिजन टेस्ट-12,

निगेटिव्ह अहवाल-12,

आज रोजी एकुण पॉझिटीव्ह रुग्ण-2,


आतापर्यंतची एकूण मृत्यू संख्या-15,
आतापर्यंतचे एकुण बाधित व्यक्ती -550, 


रुग्णालयातून सुटी दिलेली एकूण संख्या-480,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-16 (15 होम क्वारंटाईन)